जम्मू काश्मीर : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आज रामदास आठवले श्रीनगरचा दौरा करणार आहे. काश्मीर राज्यामधील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा श्रीनगरमधील वझिरबाग; इकबाल पार्क; टागोर हॉल येथे आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून ना.रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत. श्रीनगर मधील रिपाइं चे प्रमुख नेते हर्मितसिंग सासन यांनी रिपाइं चा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे.
श्रीनगर दौऱ्यात रामदास आठवले विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल यांचीही भेट आठवले घेणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार संपूर्ण देशाचा उद्धार करणारे विचार असून अखिल मानवजातीलाही प्रेरणा देणारे विचार आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार संपूर्ण जम्मू काश्मीर मध्ये घराघरात पोहोचविण्यासाठी रिपब्लिकन पक्ष काम करीत आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला ऐतिहासिक वारसा आहे. निरक्त क्रांती लोकशाही समता बंधुता ही तत्वे जम्मू काश्मीर च्या तरुणांच्या मनामनात रिपब्लिकन पक्ष बिंबविणार असून त्यासाठी येत्या आज (दि.6. ऑक्टोबर) रोजी रामदास आठवले श्रीनगर दौऱ्यावर जात आहेत.