सावधान…! गॅस गिझरच्या दुर्घटना रोखण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष द्या

88 0

गेल्या काही दिवसांपासून गॅस गिझरमुळे गुदमरून मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. नाशिकमध्ये एका महिला वैमानिकाचा गुदमरून मृत्यू घडल्याची ताजी घटना घडली आहे. त्यामुळे गॅस गिझर वापरताना प्रत्येकाने नेमकी काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती घेऊ या.

बाजारात अनेक प्रकारचे इलेक्ट्रिक व गॅस गिझर उपलब्ध आहेत. मात्र, सध्या गॅस गिझरची मागणी अधिक आहे. गॅस गिझर हा इलेक्ट्रिक गिझरपेक्षा वेगळा असतो. ते LPG वर चालते आणि पाणी गरम करतो. टाकीच्या तळाशी एक बर्नर असते. मात्र गरम पाणी पाईपद्वारे पोहोचते. इलेक्ट्रिक गिझरपेक्षा गॅस गिझर स्वस्त देखील असतो. हा वापरण्यास देखील खूप सोपा आहे. याच कारणामुळे बरेच लोक गॅस गिझर खरेदी करतात.

बंदिस्त जागेत गॅस गिझर कधीही लावू नका. गळती किंवा इतर कोणतीही समस्या असल्यास गॅस बाहेर पडण्याची शक्यता असते. बाथरूम, स्वयंपाकघर सारख्या ठिकाणी गॅस गिझर असेल तर त्या जागेतील व्हेंटिलेटर कायम खुला ठेवावा. जेणेकरून गॅसला बाहेर जाण्याची वाट मिळेल.

दिवसभर गॅस गिझरचा वापर करणे योग्य नाही. निष्काळजीपणे वापर केल्यास धोका निर्माण होतो. गॅस गिझरमुळे कोणाला समस्या आल्यास, शक्य तितक्या लवकर मोकळ्या जागेत जा. जेणेकरून श्वास घेण्यास त्रास होणार नाही. बाथरूममध्ये आंघोळ सुरू करण्यापूर्वी गॅस गिझर बंद करा. त्यामुळे आंघोळ करताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही.

गॅस गिझरमध्ये गळती झाल्यास त्यातून कार्बन मोनोऑक्साइड वायू बाहेर पडतो. यामुळे चक्कर येणे, मळमळ, उलट्या, थकवा आणि पोटदुखी होऊ शकते. तसेच श्वास घेण्यास त्रास होणे या यासारख्या समस्या देखील निर्माण होतात. आंघोळ करताना किंवा नंतर अशी कोणतीही समस्या तुम्हाला दिसली तर लगेच डॉक्टरांकडे जा.

Share This News

Related Post

Kangana Ranaut

Kangana Ranaut : कंगना रणौतची जॉन अब्राहमबद्दलची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाली ‘तो महिलांचा फायदा…’

Posted by - August 15, 2023 0
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ही नेहमी तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. कधी तिच्या काही पोस्ट तर कधी तिचे चित्रपट……
Ketki Chitale

Maratha Aarakshan : एस टी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा?; केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Posted by - November 2, 2023 0
मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarakshan) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेले उपोषण आठ दिवसांनंतरही सुरूच आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी…

महिला दिन विशेष ; प्रत्येक भारतीय महिलेला ‘हे’ कायदे माहिती असायलाच हवेत…

Posted by - March 8, 2022 0
दरवर्षी 8 मार्च जागतिक महिला दिन आजच्या जागतिक माहिला दिनानिमित्त जाणून घेऊयात महिलांना ठाऊक हव्या अशा महत्वाच्या कायद्यांबद्दलची ही खास…

पोट धरून हसाल : लिंबूच मटन , धनंजय माने इथेच राहतात का ? हे डायलॉग कधीही न विसरणारे , पण यातला एक डायलॉग घेताना मामांकडून झाली होती ‘ही’ चूक तरीही ठरला सुपरहिट

Posted by - September 26, 2022 0
अशी ही बनवाबनवी यातले डायलॉगच काय , या चित्रपटाचं नाव जरी आज कुणी घेतलं तर एक नकळत हसू चेहऱ्यावर उमटून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *