Gautami Patil

Gautami Patil : गौतमी पाटीलला सोलापूरमध्ये प्रवेश नाकारला; पोलिसांनी दिले ‘हे’ कारण

643 0

सोलापूर : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) ही तिच्या डान्समुळे नेहमी चर्चेत असते. तिचा कार्यक्रम म्हंटला तर लोकांची गर्दी आली. आणि गर्दी आली कि राडा आलाच. गौतमी आणि राडा हे जणू समीकरणच बनलं आहे. मागच्या काही महिन्यांपासुन तिचा कार्यक्रम आणि राडा ठरलेलंच आहे. यादरम्यान आता गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याची घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारण्यामागचे कारणदेखील पोलिसांनी सांगितले आहे.

या कारणामुळे नाकारली परवानगी?
नवरात्रीच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळं गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाला अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा देणं शक्य नसल्याने पोलिसांनी गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळं आता गौतमीच्या चाहत्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

नवरात्री आणि दांडियाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोलापुरातील एका माध्यम समुहाने गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी रितसर परवानगी देखील मागण्यात आली. परंतु नवरात्रीला पोलिसांना जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बंदोबस्तासाठी जावं लागणार आहे. मनुष्यबळ कमी असल्याने पोलिसांनी गौतमीच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे.

Share This News

Related Post

Tamannaah Bhatia

Tamannaah Bhatia : तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ ! महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स जारी

Posted by - April 25, 2024 0
मुंबई : साऊथ तसेच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या (Tamannaah Bhatia) अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तमन्ना…

कॉमेडीचा बादशहा राजू श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड ; बॉलीवूडवर शोककळा

Posted by - September 21, 2022 0
मुंबई : कॉमेडीचा बादशहा राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल…

मेरा पती सिर्फ मेरा है म्हणत सीमा हैदरनं शेजारणीला दाखवला जोरदार इंगा

Posted by - August 19, 2023 0
पाकिस्तानि सीमा हैदरचा शेजारणीशी सोबत जोरदार राडा. सध्या जोरदार चर्चेत असणारी आणि भारतात बेकायदशीररित्या प्रवेश घेणारी सीमा गुलाम हैदर आता…

मिस युनिव्हर्स आणि बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेनला हृदयविकाराचा झटका; इन्स्टा पोस्ट करून म्हणाली, ‘माझं हृदय…!’

Posted by - March 2, 2023 0
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिला दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्यावर एन्जिओप्लास्टी…

“आम्हाला आणखी बरीच मुले हवी आहेत”! आलियाच्या प्रेग्नेंसी न्यूजवर रणबिर कपूरची प्रतिक्रिया

Posted by - July 9, 2022 0
मुंबई :रणबिर कपूर आणि आलिया भट या जोडप्याने काही महिन्यांपूर्वीच घरातच साधेपणाने लग्न गाठ बांधली.निवडक पाहुणे आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *