Laila Khan Case

Laila Khan Case : 13 वर्षांनंतर ‘या’ अभिनेत्रीला मिळाला न्याय; तिच्या हत्याकांडाने देशात उडाली होती खळबळ

683 0

मुंबई : बॉलिवूडमधील एका दिवंगत अभिनेत्रीला तब्बल 13 वर्षांनी न्याय (Laila Khan Case) मिळाला आहे. 7 फेब्रुवारी 2011 मध्ये तिची हत्या करण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे अभिनेत्रीबरोबर तिच्या कुटुंबातील 6 लोकांचीही हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. धक्कादायक म्हणजे या अभिनेत्रीची हत्या दुसरी कोणी केली नसून तिच्या सावत्र वडिलांनी केली होती. परवेज टाक असे आरोपी वडिलांचे नाव आहे तर लैला खान असे हत्या करण्यात आलेल्या अभिनेत्रीचे नाव आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून आज परवेज टाक यांना आरोपी ठरण्यात आले आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत इतर गुन्ह्यांसहीत हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
2011 साली परवेज टाक यांनी आपली सावत्र मुलगी अभिनेत्री लैला खान, तिची आई आणि लैलाचे चार भाऊ बहिण यांची हत्या केली होती. या हत्येनंतर पुरावे नष्ट करण्यात आले. या हत्याकांडात परवेज यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. पण त्यांना किती आणि कोणती शिक्षा देण्यात यावर 14 मे रोजी कोर्टात सुनावणी होणार आहे.परवेज यांना जम्मू- काश्मीर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. लैला खान ही त्यांची सावत्र मुलगी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री होती. राहत्या घरी त्यांनी तिची हत्या केली. तिनं राजेश खन्ना यांच्याबरोबर अनेक सिनेमात काम केलं होतं. 13 वर्ष ती इंडस्ट्रीत काम करत होती.

कोण होती लैला खान?
लैला खान हिचं खरं नाव रेश्मा पटेल असं होतं. तिचा जन्म 1978 साली झाली. 2002 साली तिनं ‘मेकअप’ या कन्नड सिनेमातून काम करायला सुरुवात केली. 2008 साली ‘वफा ए डेडली’ या सिनेमात तिनं राजेश खन्नाबरोबर काम केलं. 2011 साली तिची हत्या करण्यात आली. तिच्या हत्येनंतर 13 वर्षांनी तिच्या सावत्र वडिलांना दोषी ठरवण्यात आलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Weather Update : महाराष्ट्रात जोरदार पावसाबरोबर येणार ‘हे’ मोठे संकट; हवामान खात्याने दिला इशारा

Nilesh Lanke : आपल्याला निलेश लंकेंचा बंदोबस्त करायचाय; अजित पवारांनी भरसभेत दिला इशारा

Rahul Dravid : राहुल द्रविडनंतर कोण असेल टीम इंडियाचा हेड कोच? ‘ही’ 3 नावे आहेत चर्चेत

Pune News : पुण्यात अवकाळी पाऊस; 21 ठिकाणी पडली झाडे

Loksabha : नेत्यांच्या प्रचार सभांवर अवकाळी पावसाचं संकट; ‘या’ नेत्यांच्या सभा झाल्या रद्द

Amol Kolhe : शिवाजीराव आढळराव पाटलांकडून पैसेवाटप होण्याची शक्यता; प्रतिस्पर्धी उमेदवार अमोल कोल्हे यांनी दिलं निवडणूक आयोगाला पत्र

Crime News : मुंबई – नाशिक महामार्गावरील राजूर फाटा या ठिकाणी तरुणाची भररस्त्यात हत्या

Sharad Pawar : ‘एनडीएमध्ये या’, नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ ऑफरवर शरद पवारांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया

Narendra Dabholkar : दाभोळकरांची ‘हत्या ते न्याय’; कसा होता संपूर्ण घटनाक्रम?

Bajrang Punia : बजरंग पुनियाचे निलंबन; उत्तेजक सेवन चाचणीस नकार दिल्याने केली कारवाई

Narendra Dabholkar : कोण होते नरेंद्र दाभोलकर?

Narendra Dabholkar : नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट ! 2 जणांना जन्मठेप 3 जणांची निर्दोष मुक्तता

Pune News : अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण

Mumbai-Pune Express : मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!