अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पारनेर विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली. यावेळी अजित पवारांनी निलेश लंकेवर जोरदार हल्लाबोल केला. “निलेश बेटा, तू ज्या शाळेचा विद्यार्थी आहे, त्याचा मी हेडमास्तर आहे. यंदा तुझा कंड जिरवतो. तू खासदार कसा होतो, ते बघतोच”, अशा शब्दात अजित पवार यांनी निलेश लंकेचा समाचार घेतला.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार यांनी निलेश लंकेंना आमदारकीची उमेदवारी कशी दिली, याबद्दलचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, “पारनेरसाठी उमेदवार शोधत असताना माझ्या जवळच्या लोकांनीच मला निलेश लंकेची भेट घालून दिली. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या इच्छेखातर मी निलेश लंकेला उमेदवारी दिली. पण मला वाटलं नव्हतं हा बाबा नंतर दिवे लावेल. गडी दिसायला बारीक, पण लई पोहोचलेला आहे. त्याला विकासकामांसाठी खूप निधी दिला. मला वाटायचं गरीब घरातला आहे. चांगलं काम करतोय. पण नंतर मला त्याची लक्षणं कळायला लागली.”
तसेच ते पुढे म्हणाले, “अधिकाऱ्यांनाही खुलेआम धमक्या देण्याचा प्रकार निलेश लंकेने केला. सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्यामुळे लंके धमक्या देत होते. मी उपमुख्यमंत्री असूनही जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना अतिशय नम्रतेने बोलतो. त्यांना आदर देतो. पण हा पठ्ठ्या तर “ऐ कलेक्टर इकडं ये” असं बोलायचा. पोलिसांशी बोलताना “मी तुमचा बाप बोलतोय” अशा धमकीच्या स्वरात बोलायचा.” निलेश लंकेंना इशारा देताना अजित पवार म्हणाले की, अरे निलेश बेटा तू ज्या शाळेत शिकतो, त्या शाळेचा हेडमास्तर अजित पवार आहे. तू धमक्या देऊन माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आणि मी जर तुझ्या मागे लागलो तर तुझा कंड असा जिरवीन की तुला सतत अजित पवारच दिसेल, असेही ते म्हणाले.
“तू माझ्या नादी लागू नको. महाराष्ट्रात जे जे माझ्या नादी लागले, त्यांचा पुरता बंदोबस्त केला आहे. तू तर किस झाड की पत्ती आहे. तू फार शहाणपणा करू नको. मी जोपर्यंत शांत आहे, तोपर्यंत शांत राहतो. जर तू आमच्या माणसाच्या किंवा कार्यकर्त्यांच्या केसाला जरी धक्का लावला तर तुला बघून घेईन. या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्या निलेशचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा”, असे आवाहनदेखील यावेळी अजित पवारांनी मतदारांना केले आहे.
लंके विरुद्ध विखे पाटील रंगणार लढत
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून सुजय विखे पाटील यांना तिकीट देण्यात आले आहे तर महाविकास आघाडीकडून निलेश लंकेना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारतं हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Rahul Dravid : राहुल द्रविडनंतर कोण असेल टीम इंडियाचा हेड कोच? ‘ही’ 3 नावे आहेत चर्चेत
Pune News : पुण्यात अवकाळी पाऊस; 21 ठिकाणी पडली झाडे
Loksabha : नेत्यांच्या प्रचार सभांवर अवकाळी पावसाचं संकट; ‘या’ नेत्यांच्या सभा झाल्या रद्द
Crime News : मुंबई – नाशिक महामार्गावरील राजूर फाटा या ठिकाणी तरुणाची भररस्त्यात हत्या
Sharad Pawar : ‘एनडीएमध्ये या’, नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ ऑफरवर शरद पवारांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया
Narendra Dabholkar : दाभोळकरांची ‘हत्या ते न्याय’; कसा होता संपूर्ण घटनाक्रम?
Bajrang Punia : बजरंग पुनियाचे निलंबन; उत्तेजक सेवन चाचणीस नकार दिल्याने केली कारवाई
Narendra Dabholkar : कोण होते नरेंद्र दाभोलकर?
Pune News : अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण
Mumbai-Pune Express : मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू