नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तेजक सेवन चाचणीस नकार दिल्यामुळे राष्ट्रीय उत्तेजक संस्थेकडून (नाडा) केलेल्या तात्पुरत्या निलंबनाच्या कारवाईपुढे एक पाऊल टाकत संयुक्त जागतिक कुस्ती संघटनेकडून (यूडब्ल्यूडब्ल्यू) भारताचा कुस्तीगीर बजरंग पुनियाला वर्षअखेरपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. जागतिक संघटनेच्या या निर्णयामुळे केवळ ऑलिम्पिकच नव्हे तर बजरंगच्या कारकीर्दीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
भारतातील सर्वात यशस्वी कुस्तीगीर असलेल्या बजरंगने 23 एप्रिल रोजी केलेल्या चाचणीस नकार दिल्यामुळे ‘नाडा’ने त्याच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई केली होती. चाचणीस कधी नकार दिला नसल्यामुळे चाचणीसाठी मुदत संपलेले साहित्य वापरण्यात येत असल्याबद्दल विचारणा करण्यात आली होती अशी प्रतिक्रिया बजरंगने त्यावेळी दिली होती.
जागतिक महासंघाने आपल्या संकेतस्थळावर बजरंगच्या नावापुढे निलंबित असे नमूद केले असले, तरी जागतिक संघटनेकडून आपल्याशी कुठल्याही प्रकारचा संवाद साधण्यात आलेला नाही, असे बजरंग स्पष्ट म्हणाला आहे. उत्तेजकविरोधी नियमाचे उल्लंघन केल्यामुळे ‘नाडा’ने त्याच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई केली असून, यामुळे आम्ही त्याला 31 डिसेंबर 2024 पर्यंत निलंबित करत आहोत, असे ‘यूडब्ल्यूडब्ल्यू’ने स्पष्ट केले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Narendra Dabholkar : कोण होते नरेंद्र दाभोलकर?
Pune News : अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण
Mumbai-Pune Express : मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू