pune bomb

Pune News : खळबळजनक ! पुण्यातील एनडीए परिसरात खोदकाम करताना आढळला बॉम्ब; जंगलात नेवून केला स्फोट

177 0

पुणे : शिवणे एनडीए परिसरात बाँब सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. शिवणे एनडीए परिसराच्या जवळील कमळजाई मंदिर परिसरात पुलाच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना एक बॉम्ब आढळल्यामुळे बॉम्ब नाशक पथकाच्या साहाय्याने तो एनडीएच्या जंगलात नेऊन स्फोट करून बॉम्ब नष्ट करण्यात आला आहे. एनडीएसारख्या देशातील अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब सापडल्याने परिसरात खळबळ परसरली होती.

नेमके काय घडले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत एनडीए रस्त्यावरील कमळजाई मंदिराजवळ एका ओढ्यावरील पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरु होते. यावेळी पुलाच्या खोदकाम सुरु असताना दुपारच्या सुमारास मजुरांना बॉम्बसदृश्य वस्तू आढळताच कर्मचाऱ्याने ठेकेदाराला बोलवून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर उत्तमनगर पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटना स्थळी दाखल झाले होते.
त्यानंतर बॉम्बशोधक पथकाला बोलवून तपासणी केल्यानंतर समोर आले कि कमी शक्तीचा आणि जुना बॉम्ब आल्यामुळे बॉम्ब क्षीण झाला आहे असा निष्कर्ष काढण्यात आला. त्यानंतर हा बॉम्ब सुनसान भाग असलेल्या एनडीएच्या जंगलात स्फोटकांच्या साहाय्याने स्फोट करण्यात आला आहे. शेजारी एनडीएची हद्द असल्यामुळे खूप वर्षांपूर्वी हा बॉम्ब तिथे पडलेला असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Share This News

Related Post

Dhananjay Munde

Ajit Pawar : राष्ट्रवादीचं नाव अन् चिन्ह मिळताच अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

Posted by - February 11, 2024 0
पुणे : आज पुण्यात राष्ट्रवादीचा युवक मेळावा पार पडत आहे, या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वच…

नाशिक- पुणे लोहमार्गाला केंद्रीय वित्त आयोगाची मान्यता

Posted by - February 18, 2022 0
नाशिक – पुणे- नाशिक प्रस्तावित सेमी हायस्पीड लोहमार्गासाठी केंद्रीय वित्त आयोगाने मान्यता दिली आहे. नाशिक-पुणे लोहमार्गाच्या केंद्राच्या वाट्याच्या 20% निधीपैकी…
Pune Isis Module

Pune Isis Module : एनआयएचा मोठा निर्णय ! पुणे इसिस मॉड्यूलमधील 4 जणांवर प्रत्येकी 3 लाखांचे बक्षीस

Posted by - September 12, 2023 0
पुणे : पुणे शहरात 18 जुलै रोजी पुणे पोलिसांनी दोन दशतवाद्यांना अटक (Pune Isis Module) केली होती. या दोन्ही दहशतवाद्यांचा…

शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

Posted by - February 16, 2023 0
पुणे : शिवनेरी किल्ला जुन्नर येथे १९ फेब्रुवारी रोजी आयोजित शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर १८ फेब्रुवारी सकाळी ८ वाजल्यापासून ते १९…

अधिसभा निवडणुकीसाठी विद्यापीठ प्रशासन सज्ज; निर्भिडपणे आणि जबाबदारीपूर्वक प्रक्रिया पार पाडण्याचे कुलगुरूंचे आवाहन

Posted by - November 16, 2022 0
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान होणार असून यासाठीची विद्यापीठाची तयारी अंतिम टप्प्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *