पुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) यांच्या हत्या प्रकरणात कोर्टाने नुकताच निकाल दिला आहे. तब्बल 11 वर्षांनी दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळकर यांना दोषी ठरवलं आहे. दोघांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर याप्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.
काय घडले होते 11 वर्षांपूर्वी ?
20 ॲागस्ट 2013 ला मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या डॉ. दाभोलकरांवर दुचाकी वरुन आलेल्या दोन जणांनी गोळ्या झाडल्या होत्या. बालगंधर्व जवळील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर ही घटना घडली होती. पुणे पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणात नागोरी टोळीला अटक केली होती. मात्र नंतर या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. या प्रकरणी मग दाभोलकर कुटुंबीयांनी हाय कोर्टात याचिका देखील दाखल केली होती. या प्रकरणात सचिन अंदुरे, शरद कळस्कर, वीरेंद्र तावडे, अॅडव्होकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर आरोपपत्र देखील दाखल करण्यात आलं होतं.
नरेंद्र दाभोलकर यांचे कार्य?
1945 मध्ये जन्मलेल्या दाभोलकरांनी 1980 च्या दशकात सामाजिक कार्यकर्ते होण्यापूर्वी 12 वर्षे डॉक्टर म्हणून काम केले होते. सामाजिक कार्यकर्ते म्हणून कामाच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे लक्ष सामाजिक न्यायावर होते. 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धापासून त्यांनी अंधश्रद्धेच्या विरोधात सक्रियपणे वकिली करण्यास सुरुवात केली. त्यांनी 1989 मध्ये MANS ची स्थापना केली, जी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी विशेषत: महाराष्ट्र राज्यात कार्यरत आहे. दाभोलकर हे देशातील स्वयंभू धर्मगुरूंवरही टीका करत होते आणि त्यांच्या संघटनेने विश्वासूंना चमत्कारिक बरे करण्याचे वचन देणाऱ्या अशा माणसांचा सामना करण्यासाठी आपले बरेचसे प्रयत्न केले. दाभोलकरांनी दलित आणि समाजातील इतर उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठीही काम केले. 2010 पासून दाभोलकर आणि त्यांच्या संघटनेने महाराष्ट्र सरकारने जादूटोणाविरोधी कायदा मंजूर करून घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले. तथापि, त्यांच्या प्रयत्नांना राजकीय पक्षांनी, विशेषत: शिवसेना आणि भाजपने जोरदार विरोध केला , ज्यांचे मत होते की असा कायदा हिंदू संस्कृतीच्या विरोधात जाईल.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण
Mumbai-Pune Express : मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू