मुंबई : मनोरंजविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संगीत सिवन (Sangeeth Sivan) यांचं 8 मे रोजी मुंबईत निधन झाले आहे. वयाच्या 61 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे मात्र समजू शकलेले नाही. बॉबी देओलपासून रितेश देशमुखपर्यंत अनेक टॉलिवूड आणि बॉलीवूड स्टार्सना त्यांच्या करिअरच्या शिखरावर नेणारे दिग्दर्शक संगीत सिवन यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानं दक्षिण आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
संगीत सिवन यांनी केवळ मल्याळममध्येच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीत मोठ्या प्रमाणावर काम केलं आहे. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. मोहनलाल यांच्यासोबतच्या ‘योधा’ या चित्रपटासाठी ते प्रसिद्ध होते. हिंदीमध्ये त्यांनी ‘क्या कूल हैं हम’, ‘अपना सपना मनी मनी’ आणि ‘यमला पगला दीवाना 2’ हे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. सिवन यांच्या निधनाने सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला आहे.
संगीत सिवन यांनी रघुवरन आणि सुकुमारन अभिनीत ‘व्यूहम’ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं. त्यांनी ‘योधा’, ‘गंधर्वम’ आणि ‘निर्मय’ या तीन ब्लॉकबस्टर चित्रपटांसोबतच ‘चुरा लिया है तुमने’, ‘क्या कूल हैं हम’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘यमला पगला दीवाना 2’ यांसारखे बॉलिवूड चित्रपटही दिग्दर्शित केले आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Ajit Pawar : शरद पवार त्यांना हवं तसं करतात अजित पवारांचे मोठे वक्तव्य
Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात 20 जणांच्या टोळक्यांकडून 2 तरुणावर जीवघेणा हल्ला