मुंबई : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (Olympic Games) क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत आयओसीच्या 141 व्या अधिवेशनातील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तब्बल 128 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा सामना होणार आहे. याआधी 1900 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी इंग्लंडने फ्रान्सला हरवून सुवर्णपदक पटकावलं होतं.
2028 ची ऑलिम्पिक स्पर्धा अमेरिकेतील लॉस एंजिलिसमध्ये होणार आहे. या ऑलिम्पिकमध्ये टी20 फॉरमॅटमध्ये क्रिकेट सामने खेळवले जाणार आहेत. 15 ऑक्टोबरपासून मुंबईत आयओसीची बैठक सुरू आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या बैठकीत क्रिकेटसह पाच खेळांच्या समावेशाचा निर्णय घेण्यात आला. आयओसी सदस्या नीता अंबानी यांनी समितीच्या या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे.
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या टी20 फॉरमॅटचा समावेश करण्याबाबत आयओसीने अधिकृत निर्णय घेतला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने समोवारी एलए गेम्ससाठी रोस्टरमध्ये पुरुष आणि महिलांच्या सामन्यांसह इतर चार खेळांच्या समावेशासाठीही मतदान केले.