Noida

नोएडामध्ये फॅशन शोदरम्यान मोठी दुर्घटना; लोखंडी खांब अंगावर पडून 24 वर्षीय मॉडेलचा जागीच मृत्यू

342 0

नोएडा : नोएडातील (Noida) सेक्टर-16ए पोलीस स्टेशन हद्दीतील फिल्मसिटीमध्ये (Film City) असलेल्या लक्ष्मी स्टुडिओमध्ये फॅशन शो (Fashion Show) सुरु असताना एक भीषण दुर्घटना घडली. यामध्ये लोखंडी खांब (Iron Pillar) अंगावर कोसळून 24 वर्षीय मॉडेलचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी फॅशन शोच्या आयोजकासह चार जणांना अटक केली आहे.

काय घडले नेमके?
रविवारी (11 जून) दुपारी दीड वाजता फिल्मसिटीच्या लक्ष्मी स्टुडिओमध्ये फॅशन शोचा कार्यक्रम सुरु होता. लायटिंगच्या उद्देशाने लोखंडी खांब उभारण्यात आला होता. पण तो स्टेजवर असलेल्या मॉडेलच्या अंगावर पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. वंशिका चोप्रा वय 24 वर्ष, रा. दिव्यांश फ्लोरा, गौर सिटी-2 असं मृत मॉडेलचं नाव आहे तर बॉबी राज, (रा. गोपाल पुरा, ग्वाल्हेर रोड, आग्रा) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून फॅशन शोचा आयोजक आणि लायटिंगच्या कामात सहभागी असलेल्या चार जणांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे अशी माहिती नोएडाचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त मोहन अवस्थी यांनी दिली आहे.

Share This News

Related Post

Chatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : शेतीच्या वादातून काकाने पुतण्यावर तलवारीने केले सपासप वार

Posted by - July 25, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये शेतीच्या वादातून दोन गटामध्ये मोठा राडा…

ब्रेकिंग न्यूज ! गुजरातमध्ये मिठाच्या कंपनीमध्ये भिंत कोसळून १२ मजुरांचा मृत्यू

Posted by - May 18, 2022 0
अहमदाबाद- गुजरातमधील मोरबी येथील हलवड भागात एका मिठाच्या कंपनीमध्ये भिंत कोसळून १२ मजुरांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली ३० मजूर अडकले…
Crime

चोरीच्या उद्देशानं गेले आणि झालं भलतचं; नागपुरात भर दिवसा एका रिक्षाचालकाचा….

Posted by - April 22, 2023 0
नागपूर: नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून सीताबर्डी येथील  हॉटेल गुजरात येथील हनुमानगल्लीत एका ऑटोचालकाचा दगडाने ठेचून खून केल्याची…
Pune Murder

भर दिवसा तरुणाची गोळ्या झाडून हत्या! पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरलं

Posted by - May 22, 2023 0
पिंपरी-चिंचवड : पुण्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. काही दिवसांपूर्वी तळेगाव-दाभाडे नगरपरिषदेच्या परिसरात जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे…

#CRIME NEWS : दारूच्या नशेत नातवाने 90 वर्षाच्या आजीला मारहाण करून संपवलं; वडिलांना उचलून जमिनीवर आपटलं, दारुणे कुटुंब उध्वस्त केलं !

Posted by - February 14, 2023 0
नवी दिल्ली : दारूच्या आहारी गेल्याने आजपर्यंत अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. अजून एक उदाहरण त्यामध्ये आता मोजले जाणार आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *