Satara Death

लेकीला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या दांपत्यावर काळाचा घाला; पत्नीचा जागीच मृत्यू

439 0

सातारा : आजकाल कधी काय होईल हे सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये आपल्या लेकीला भेटायला जात असताना पुणे – बंगळुरू आशियाई महामार्गावर (Pune – Bangalore Highway) खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात (Khambataki Ghat) अपघातग्रस्त एस आकाराच्या धोकादायक वळणावर भरधाव वेगात येणाऱ्या मालट्रकने दुचाकीला धडक दिल्याने सिंधुबाई जनार्दन गुरव (वय 62, रा. जोशी विहीर, ता. वाई लोकरेची अनवाडी ) (Sindhubai Janardhan Guruv) या जागीच ठार झाल्या तर दुचाकीचालक जनार्दन जगन्नाथ गुरव हे किरकोळ जखमी झाले.

काय घडले नेमके?
या अपघाताबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशीविहीरहून (ता. वाई ) सारोळा (ता. भोर) येथे आपल्या लेकीला भेटण्यासाठी दुचाकीवरून (क्रमांक एमएच 11 सीवाय 7804) निघालेले गुरव दांपत्यांना पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या मालट्रकने (क्रमांक एमएच 14 जीयू 3130) जोरदार धडक दिली. यावेळी दुचाकीवर मागे बसलेल्या सिंधुबाई गुरव यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या, तर पती जनार्दन गुरव हे किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच खंडाळा पोलीस निरीक्षक महेश इंगळे व पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे यांच्यासह वाहतूक पोलीस गणेश सणस, जाधव, पोळ, महागंडे, धायगुडे व अमित चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले. खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. प्रभाकर गणपत किनगे (रा. मालेगाव कल्याणी, ता. निलंगा, जि. लातूर ) या मालट्रक चालकास पोलिसांनी अटक केली आहे.

Share This News

Related Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना श्रद्धांजली

Posted by - November 30, 2022 0
मुंबई : ‘समाजजीवनाशी एकरूप होऊन आपल्या लेखनातून मराठी साहित्यात मोलाची भर घालणारा स्वतंत्र प्रतिभेचा, कृतीशील साहित्यिक गमावला आहे, अशा शब्दांत…
Solapur News

Solapur News: धक्कादायक! शेततळ्यात उडी मारुन शिपायाची आत्महत्या; पत्नी आणि मुले बचावली

Posted by - August 9, 2023 0
सोलापूर : सोलापुरामधून (Solapur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये खाजगी शाळेत शिपाई म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने…
Mumbai Pune Express Way

Mumbai Pune Express Way: ‘या’कारणामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे झाली ठप्प!

Posted by - August 2, 2023 0
मुंबई : पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर (Mumbai Pune Express Way) खंडाळा घाटातील खंडाळा बोगद्याच्या आतमध्ये तिन्ही लेनवर एक अवजड कंटेनर…

संबंधांमध्ये अडथळा ठरत होती 3 वर्षांची चिमुकली; आईनेच काढला असा काटा, अंगावरच्या शालिनी पोलिसांनी असा काढला आरोपींचा मागोवा

Posted by - March 10, 2023 0
पुणे : संबंधित घटनाही पुण्यातील खडकी परिसरामध्ये एका तीन वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर सुरू झाली. या मुलीच्या मृतदेहाच्या अंगावर असलेल्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *