Maharashtra Rain

Weather Update : राज्यात आज पावसाची दाट शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

605 0

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात (Weather Update) मोठा बदल झाला आहे. काल विदर्भात आणि मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली. तर पुण्यात देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान आज देखील राज्यात वादळी वारे, गारपीट आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

‘या’ जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट ?
राज्यात धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुण्यात असे असेल हवामान
पुणे व आजूबाजूच्या परिसरात येथे 48 तासात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र आकाश मुख्यतः निरभ्र राहील. 3 तारखे नंतर किमान तापमानामध्ये जवळजवळ 4 डिग्री सेल्सिअसणे घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात मात्र फारसा बदल होणार नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Vrikshasana : वृक्षासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!