संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारी घटना उरण शहरात घडली होती. 20 वर्षीय यशश्री शिंदे नावाच्या तरुणीची हत्या करून अतिशय छिन्नविच्छिन्न अवस्थेत तिचा मृतदेह विटंबना करून टाकून दिल्याचे आढळून आले होते. हा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला होता. ज्याच्या रिपोर्ट मधून अनेक गोष्टींचा खुलासा होणार होता. आणि आता हे रिपोर्ट पोलिसांच्या हाती आले आहेत. या रिपोर्ट मधून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
उरण शहरात राहणारी यशश्री शिंदे ही 20 वर्षीय तरुणी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. तिचा शोध सुरू असतानाच यशश्रीचा मृतदेह काल कोटनाका पेट्रोल पंपाजवळ आढळून आला. यशश्री च्या चेहऱ्याचा अक्षरशः चेंदामेंदा करण्यात आला होता. प्रायव्हेट बॉडी पार्ट वर जखमा आढळल्या. त्यामुळे हे प्रकरण समोर येताच नवी मुंबईत संतप्त वातावरण झाले होते. नागरिकांच्या मोठ्या आक्रोशाला सामोरे जावे लागले. त्यामुळे युद्धपातळीवर पोलीस आरोपीचा शोध घेत होते. त्यानंतर आता हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. यशश्रीची हत्या नेमकी कशी करण्यात आली ? हत्या करण्याआधी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते का ? याचा उलगडा पोस्टमार्टम रिपोर्ट मधून होणार होता.
हे पोस्टमार्टम रिपोर्ट अखेर पोलिसांच्या हाती आले आहेत ज्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. यशश्री चा चेहरा पूर्ण विद्रूप झाला होता. तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आणि वार केले होते. तिच्या गुप्तांगांवर देखील अनेक जखमा आढळून आल्या. यशश्री चा मृतदेहाला भटक्या प्राण्यांनी अनेक ठिकाणी चावा घेतल्याचे उघड झाले आहे. भटक्या प्राण्यांनी घेतलेल्या चाव्यामुळेच तिचा चेहरा विद्रूप झाला होता. या प्राण्यांनी तिच्या शरीरावरील मास खाल्ले आहे. तर कमरेवर आणि पाठीवर असलेल्या जखमा या चाकूच्या आहेत. त्याचबरोबर यशश्रीवर हत्या करण्याआधी बलात्कार झालेला नाही आणि प्रथमदर्शी ही हत्या एकाच व्यक्तीने केल्याचे शवविच्छेदनातून समोर आले आहे. या संदर्भातला पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.