Stock Market : रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे काय ?

133 0

Stock Market : शेअर बाजारात थोडाफार पैसा कमावून चांगला फायदा कमावण्याची इच्छा सर्वांनाच असते. परंतु यात फार कमी लोकच यशस्वी होतात. यामागचे प्रमुख कारण म्हणजे अनेकांना बाजाराचा स्वभाव कळत नाही आणि गुंतवणूकीसाठी कंपनीची निवड करतानाही गोंधळलेले असतात.

शेअर बाजारात लिस्टेड कंपन्या या प्रत्येक तिमाहीत निकाल जारी करतात आणि यावरून त्याच्या आर्थिक स्थितीची माहिती कळते. त्याचबरोबर बाजारातील तज्ज्ञ हे निकालाच्या आधारावर कंपनीच्या स्थितीचे आकलन करतात. त्यासाठी फॉर्म्युल्याची मदतही घेतात. याप्रमाणे कंपनीच्या भविष्यातील वाटचालीचे आकलन करतात. असाच एक फॉर्म्युला आरओई असून त्याच्या मदतीने आपण कोणत्याही कंपनीच्या दिशेचा अंदाज घेऊ शकता. चांगल्या कंपनीची निवड करून आगामी काळात चांगले उत्पन्न मिळवू शकता.

रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे काय ?
रिटर्न ऑन इक्विटीच्या मदतीने गुंतवणुकीसाठी कोणती कंपनी चांगली आहे किंवा कोणत्या कंपनीची कामगिरी चांगली राहिल, याचे आकलन करता येईल. शेअरधारकांना कंपनीकडून चांगला मोबदला किंवा परतावा दिला जात असल्याचे आरओईधारक कंपन्या सांगतात. विशेष म्हणजे आरओईचे अधिक प्रमाण असणार्‍या कंपन्यांवरील कर्जाचे ओझे कमी असते आणि व्याजापोटी कमी पैसा बाहेर जात असतो. आरओईचा आकडा हा केवळ कंपनीचा विकास सांगत नाही तर या माध्यमातून कंपनी आगामी काळात लाभांश देणार आहे की नाही, हे देखील सांगते. कंपनीकडे शेअरधारकांना देण्यासाठी पैसे आहेत की नाही, हे देखील या फॉर्म्युल्यातून समजते.

(ROE) आरओईच्या पडताळणीचा फॉर्म्युला
आरओई कॅलक्युलेट कसे केले जाते हे आपण जाणून घेऊ. त्याची पद्धत सोपी आहे. कंपनीचे निव्वळ उत्पन्न काढा. कंपनीच्या एकूण उत्पन्नातून व्याज, कंपनीचा खर्च, कर आणि अन्य खर्चाची कपात करा. त्यानंतर राहिलेली रक्कम ही निव्वळ उत्पन्न म्हणून गृहित धरता येईल. आता नेट इन्कमला शेअरधारकांच्या इक्विटीने भागल्यास त्यानंतर येणारा आकडा हा आरओई असेल.

Share This News

Related Post

Aadhaar Link Voter ID

Aadhaar Link Voter ID : आता वोटर कार्ड – आधार कार्ड लिंक करावं लागणार? सरकारकडून नवीन अपडेट जारी

Posted by - December 10, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्ड आणि वोटर कार्ड (Aadhaar Link Voter ID) हे महत्वाचे कागदपत्रे आहेत. आधार –…
1 April

New Financial Rules : लोकांच्या खिशाला बसणार कात्री ! ‘या’ नियमांमध्ये होणार बदल

Posted by - April 1, 2024 0
आजपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात (New Financial Rules) होत असून अनेक आर्थिक नियमांमध्ये बदल झाले आहेत. नवीन आर्थिक वर्ष लागू…

नवीन घर खरेदी करताय; तर ही आहे तुमच्या कामाची बातमी

Posted by - June 30, 2023 0
आता घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी अडकून पडलेले लाखो गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार निधी देणाऱ्या त्यामुळं घर खरेदी…

Stock Market : भारतीय शेअर बाजारासाठी आज काळा दिवस; गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा फटका

Posted by - December 23, 2022 0
Stock Market : या आठवड्यातील व्यवहाराचा शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी काळा दिवस ठरला. आज सकाळपासून सुरू झालेली घसरण कायम…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *