मुलांच्या आहारामध्ये ‘या’ गोष्टींचा समावेश करा, मुलं बनतील चाणाक्ष आणि फिट

226 0

आजच्या परिथितीत मुलांना खुप धावपळ होते.अभ्यास,शाळा, वेगवेगळे क्लास त्यामुळं मुलांना जास्त एनर्जीची गरज असते.प्रत्येक गोष्टींत खुप कॉम्पिटेशन आहे आणि त्यात यश मिळवण्यासाठी बुद्धीबरोबर मुलांचा शारीरिक विकास होणेही तेवढेच गरजेचं आहे.त्यामुळं मुलांच्या आहारात खालील पदार्थांचा समावेश नक्की असावा.

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य आहाराची खुप गरज असते. मुलांना हिरव्या भाज्या, कडधान्य हे पदार्थ खाण्याचा खुप कंटाळा येतो. त्यांचा पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईस या फास्टफूडवर जास्त भर असतो.स्पोर्ट्स मध्ये मुलांना फास्ट फुड खाण्यास बंधन घातले जाते कारण की, फास्ट फूड खाल्याने इम्युनिटी पॉवर कमी होते. फास्ट फूड हे शरीराला हानिकारक असते त्यामुळं हे सर्वांनीच खाणं टाळलं पाहिजे. लहान मुलांच्या जेवणात या गोष्टी तुम्ही अशा पद्धतीनं देऊ शकता.

दही

दह्यामध्ये प्रोटीन खुप प्रमाणात असतात. तसेच आयोडीन, झिंक, व्हिटॅमिम बी – 12 दह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सामवेश असतो. आणि हे सगळे घटक मेंदूच्या विकासासाठी खुप उपयुक्त ठरतात .त्यामुळं मुलांना प्लेन दही देऊ शकता किंवा,मुलं गाजर, काकडी खात नाहीत अशा वेळी हे पदार्थ खिसुन दह्यामध्ये टाकुन,त्यात थोडी साखर घालून मुलांना देऊ शकता. त्यामुळं मुलांच्या आहारात दही जाईलच पण त्याचबरोबर सॅलेड सुद्धा खाण्यात जाईल.

भिजवलेले बदाम

बदामामध्ये फॉस्फरस, लोह, कॅल्शिअम, व्हिटॅमिन बी,प्रोटीन हे घटक असतात. मुलांच्या आहारात बदामाचा सामवेश असणे खुप गरजेचे असते. बदामाच्या नियमित सेवनानं मेंदूचा चांगला विकास होतो. आकाराने लहान असलेले बदाम आरोग्यासाठी खुप फायदेशीर ठरतात.मुलांना सुके बदाम देऊ शकता पण भिजवलेले बदाम दिल्यास जास्त चांगले. भिजवलेले बदाम पचण्यास सोपे असतात. रोज 5 ते सहा बदाम रात्री भिजू घालुन सकाळी मुलांना खायला दिल्यास खुप फायदेशीर ठरतात. मुलांना फक्त भिजवलेले बदाम खायला आवडत नसतील तर ते खिसून दुधामध्ये टाकुन देऊ शकता. तसेच सुक्या बदामाची पाउडर बनवून गरजेनुसार शिऱ्यामध्ये तसेच दुधात घालु शकता. अशा पद्धतीनं मुलांच्या आहारात बदामाचा समावेश करू शकता.

अंडी

पोषक गुणधर्मांचा खजिना असणारा पदार्थ म्हणजे अंडी.अंड्यामध्ये पोषक तत्वे आणि प्रोटीन् चा समावेश जास्त प्रमाणात असतो. उकडलेले अंडे दररोज खाल्याने मेंदूचा विकास तर होतोच पण तुमचा स्टॅमिना खुप वाढतो. स्पोर्ट्स मध्ये असणाऱ्या मुलांच्या आहारात अंड्याचा समावेश असणे खुप गरजेचे आहे.

संत्री

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी चा समावेश खुप प्रमाणात आढळून येतो. मुलांच्या आहारात संत्रे असणे खुप गरजेचे आहे. नियमित संत्री खाल्याने मुलांमध्ये उत्साह निर्माण होतो. पॉसिटीव्ह एनर्जी मिळते तसेच मेंदू व शरीराच्या वाढीसाठी संत्र्याच सेवन करणे खुप आवश्यक आहे.

मुलांच्या आहारात या सगळ्या पदार्थांचा सामवेश असणे खुप आवश्यक आहे.

Share This News

Related Post

पुणे महापालिकेकडून गुंठेवारी नियमितीकरणाला ३० जूनपर्यंत मुदतवाढ

Posted by - April 2, 2022 0
पुणे- पुणे महापालिका प्रशासनाने गुंठेवारी नियमितीकरणाला पुन्हा मुदतवाढ दिली आहे. आता 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम…

मानवाधिकारांवर जयशंकर यांनी अमेरिकेला दिले सणसणीत प्रत्युत्तर

Posted by - April 14, 2022 0
वॉशिंग्टन- अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात शीखांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांदरम्यान भारताच्या कथित मानवाधिकार उल्लंघनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अमेरिकेला भारताचे परराष्ट्र मंत्री…
missing girls

Missing Girls : धक्कादायक! राज्यात रोज सरासरी ‘इतक्या’ मुली होतायत गायब; आकडेवारी आली समोर

Posted by - May 8, 2023 0
पुणे : महाराष्ट्रातून मुलींच्या बाबतीत एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये राज्यात मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. एकट्या…

राज्यात ‘या’ दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची हवामान विभागाने वर्तवली शक्यता

Posted by - April 19, 2022 0
दिवसेंदिवस हवामानात बदल होत आहे. राजस्थान, दिल्ली, गुजरात यासह अन्य राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटांमुळे नागरिक हैराण आहेत. भारतीय हवामान विभागाने सोमवारी…

हरितालिका व्रत का करतात ?

Posted by - August 30, 2022 0
हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारीकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *