heat-stroke

Raigad Loksabha : धक्कादायक ! रायगडमध्ये मतदान केंद्रासमोरच मतदाराचा उष्माघाताने मृत्यू

342 0

रायगड : तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी (Raigad Loksabha) आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यादरम्यान रायगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये मतदान करण्यासाठी गेलेल्या एका मतदाराचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील किंजळोली बुद्रुक या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
प्रकाश केशव चिनकाटे (राहणार किंजळोली दाभेकर कोंड) असे मृत पावलेल्या मतदाराचं नाव आहे. ते सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जात होते. मात्र, मतदान केंद्रापासून शंभर मीटर अंतरावर असतानाच प्रकाश चिनकाटे यांना चक्कर आली आणि ते जाग्यावर कोसळले. यानंतर त्यांना घरी नेण्यात येत होतं, मात्र त्यांचा मृत्यू झाला.

आज तिसऱ्या टप्प्यात सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, बारामती, माढा, रायगड, रत्नागिरी, हातकणंगले आणि धाराशिवमध्ये मतदान होत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Loksabha Elections : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : नारायण राणेंनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Supriya Sule : मतदानानंतर सुप्रिया सुळेंनी गाठले अजित पवारांचे घर

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Lok Sabha Election : राज्यातील मतदानाची टक्केवारी घसरली

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!