नाना पटोले यांच्या जावयाचा भाऊ आणि व्याह्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा

450 0

पिंपरी- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जावयाचा भाऊ आणि व्याह्यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जावयाचा भाऊ रोहित शंकर काळभोर आणि व्याही शंकर नामदेव काळभोर अशी या प्रकरणातील आरोपींचे नावे आहेत. न्यायालयाच्या आदेशावरून दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पवन मनोहरलाल लोढा यांनी फिर्याद दिली आहे.

रोहित काळभोर आणि शंकर काळभोर यांनी मनोहरलाल लोढा यांच्या कंपनीचे बनावट सही, शिक्के तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन मनोहरलाल लोढा यांची खराबवाडी, चाकण या ठिकाणी एक्सा एलाईज नावची कंपनी आहे. या कंपनीला रोहित काळभोर आणि नामदेव काळभोर यांची कोहिनूर ट्रेंड होम ही कंपनी भंगार मालाचा पुरवठा करत होती. भंगार मालाचा पुरवठा करण्याच्या मोबदल्यात रोहित काळभोर आणि शंकर काळभोर यांनी पवन मनोहरलाल लोढा यांच्या एक्सा एलाईज कंपनीकडून जवळपास 78 लाख रुपयांचे काही अग्रिम चेक घेतले होते.

मात्र पवन मनोहरलाल लोढा यांच्या कंपनीच्या सहमती शिवाय रोहित काळभोर आणि शंकर काळभोर यांनी ते अग्रीम घेतलेले चेक बँकेत वटविण्यास लावले होते. मात्र, पवन मनोहरलाल लोढा यांनी बँकेकडे वेळीच तक्रार दाखल केल्याने ते चेक जमा होऊ शकले नाही. या प्रकरणात पवन मनोहरलाल लोढा यांनी न्यायालयात केलेल्या तक्रारीवरून पिंपरी पोलिसांनी अधिक तपास करून रोहित काळभोर आणि शंकर काळभोर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Share This News

Related Post

Prabhas Fan

आदिपुरूष चित्रपटाबाबत निगेटिव्ह प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तीला प्रभासच्या फॅननं थिएटरबाहेर धू धू धुतला

Posted by - June 16, 2023 0
मुंबई : अभिनेता प्रभास आणि कृती सेननची प्रमुख भूमिका असलेला आदिपुरूष हा सिनेमा आज रिलीज झाला. संपूर्ण देशातील प्रेक्षक या…
Pune Crime News

Pune Crime News : धक्कादायक ! पुण्यात तरुण व्यावसायिकाची स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या

Posted by - June 11, 2024 0
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना (Pune Crime News) समोर आली आहे. यामध्ये एका व्यावसायिक तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…

SPORTS : फुटबॉल लेजंड..,’सिक्रेट’ रेकॉर्डिंग आर्टिस्ट, ब्राझीलचे 82 वर्षीय फुटबॉलचे दिग्गज खेळाडू पेले यांचे निधन; कॅन्सरशी झुंझ संपली

Posted by - December 30, 2022 0
ब्राझील : ब्राझीलचे ८२ वर्षीय फुटबॉलचे दिग्गज खेळाडू पेले यांचे गुरुवारी (२९ डिसेंबर) सो पाउलो येथील रुग्णालयात निधन झाले. सप्टेंबर…

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचं छत्रपती शिवरायांना पत्र! काय लिहिलंय पत्रात… पाहा

Posted by - December 3, 2022 0
छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज किल्ले रायगडावर आक्रमक भाषण केलं. निर्धार शिवसन्मानाचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *