Mumbai Fire News

Mumbai Fire News : अंधेरीतील हिरा-पन्ना मॉलला भीषण आग

545 0

मुंबई : मुंबईतील अंधेरी या ठिकाणाहून (Mumbai Fire News) एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पश्चिम उपनगरातील ओशिवरा या ठिकाणी हिरा पन्ना मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. आग लागल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगीत काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हिरा पन्ना मॉलमधील दुसऱ्या मजल्यावर अनेक कमर्शियल गाळे आहेत. या गाळ्यांमध्ये काम करणारे तसेच ऑफिस कर्मचारी यात अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान आणि ओशिवरा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. ही आग एवढी भीषण आहे कि या आगीचे लोट दूरपर्यंत पसरले आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!