Parbhani News

पुण्यात माणुसकीला काळीमा! लाथा, बुक्क्या आणि दगडाने मारून मजुराची निर्घुण; हत्येचं धक्कादायक कारण आलं समोर

570 0

पुण्यातील येरवडा परिसरात असलेल्या नाल्याचे चेंबर बांधताना बिगारी काम करणाऱ्या मजुराकडून चुकून अंगावर चिखल उडाल्याच्या रागात तरुणांनी लाथा बुक्क्या मारून आणि डोक्यात दगड घालून मजुराची हत्या केली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

ज्ञानेश्वर निवृत्ती वाघमारे (वय ४४, रा.विकास नगर, किवळे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. १९ जून रोजी वाघमारे हे येरवडा परिसरात असलेल्या नाल्यावर चेंबर बांधण्याचे काम करत होते. त्यांच्याकडून अनवधनाने रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणांच्या अंगावर चिखल उडाला. त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर वाघमारे यांच्या तोंडावर दगड मारले. ज्यात गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तात्काळ ससून रुग्णालयात दाखल केले होते. मात्र बारा दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याप्रकरणी भगवान आसबे (वय ४७) यांच्या तक्रारीवरून एक अल्पवयीन मुलगा, राज सोमनाथ परदेशी (वय.१९, चाकण), प्रणव वाल्मीक अंत्रे (वय.२०, रा.दिघी) आणि चैतन्य रावसाहेब साळवी (रा. विश्रांतवाडी) यांच्यावर खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र पीडित व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कलम वाढ करण्यात आली असून राज आणि प्रणव या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर चैतन्य साळवी हा फरार असून अल्पवयीन मुलाला ही ताब्यात घेण्यात आले आहे.

Share This News

Related Post

Dasgupta

धक्कादायक! 29 वर्षीय ‘या’ अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू

Posted by - May 21, 2023 0
मुंबई : मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका अभिनेत्रीचा अपघाती (accident) मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सगळ्यांना…
Mallika Rajput

Suicide News : धक्कादायक! कंगनासोबत काम केलेल्या ‘या’ अभिनेत्रीची राहत्या घरी आत्महत्या

Posted by - February 13, 2024 0
मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री विजय लक्ष्मी उर्फ ​​मल्लिका राजपूत हिने तिच्या सुलतानपूर…

सावधान ! डिजिटल कर्ज देणाऱ्या ॲपवरून कर्ज घेताय ? आधी ही माहिती जाणून घ्या (VIDEO)

Posted by - August 3, 2022 0
डिजिटल कर्ज : आजकाल सर्वकाही डिजिटल झालंय.अगदी भाज्यांच्या खरेदी पासून ते मोठमोठ्या खरेदी डिजिटल स्वरूपात केल्या जातात. स्मार्टफोनवर सर्व गोष्टी…
Crime

हनीट्रॅप टाकून तरुणीने व्यावसायिकाकडून लुबाडले १७ लाख ५० हजार रुपये, पुण्यातील धक्कादायक घटना

Posted by - March 30, 2023 0
बलात्काराची केस करण्याची धमकी देऊन एका व्यावसायिकाला १७ लाख ५० रुपयांचा गंडा घालणाऱ्या तरुणीला आणि तिच्या वकील साथीदाराला हडपसर पोलिसांनी…

‘….. नाहीतर तुम्हाला महाग जाईल’, पोलिसांना दम भरणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

Posted by - April 12, 2023 0
गाडीला काळ्या काचा लावून पोलिसांना दमबाजी करणार्‍या तरुणाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. चौकशी केल्यावर तो तोतया पोलीस असल्याचे निष्पन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *