ठाण्यात डॉक्टर आणि कुटुंबीयांवर घरात घुसून जीवघेणा हल्ला; हल्ल्याचा धक्कादायक कारण आलं समोर

431 0

ठाण्यात एक अतिशय गंभीर घटना घडली आहे. ठाण्यातील उल्हासनगर परिसरात राहणाऱ्या डॉक्टरच्या घरात घुसून डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. दहा ते बारा जणांच्या टोळक्याने हातात लाठ्या काठ्या घेऊन डॉक्टरच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आहे आता समोर आले आहे.

उल्हासनगर परिसरात राहणाऱ्या डॉ. सागर धुतोडे यांच्याबरोबर हा गंभीर प्रसंग घडला आहे. उल्हासनगर मधील कॅम्प नंबर पाचच्या कैलास कॉलनी रस्त्यावरून डॉ. धुतोडे हे घरी जात असताना, एक बाईकस्वार तरुण स्टंटबाजी करत होता. धुतोडे यांनी काळजीपोटी या तरुणाला हटकले. मात्र याचा तरुणाला राग आला. त्यानंतर रात्रीच्या वेळी दहा-बारा जणांना सोबत घेऊन हा तरुण थेट डॉक्टरांच्या घरात घुसला. या तरुणांच्या हातात लाठ्या काठ्या होत्या.

याच काठ्यांनी डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात डॉक्टर सागर आणि त्यांचा भाऊ गंभीर जखमी झाले आहेत.

अतिशय शुल्लक कारणावरून या टोळक्याने डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांना जबर मारहाण केली. ही घटना डॉक्टरांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये देखील कैद झाली. त्यांनी तात्काळ पोलिसात धाव घेतली व हिललाईन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली. अखेर या हल्ल्याप्रकरणी आरोपी अजय वाकोडे, संदेश बनसोडे यांच्यासह त्यांच्या इतर तीन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share This News

Related Post

Suicide News

Suicide News : ‘ही’ दोस्ती तुटायची म्हणत 2 जिवलग मित्रांची ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या

Posted by - July 18, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना (Suicide News) समोर आली आहे. यामध्ये दोन जिवलग मित्रांनी धावत्या ट्रेनखाली उडी…
TV Actor Bhupinder Singh

TV Actor Bhupinder Singh : खळबळजनक ! ‘या’ अभिनेत्याचा दिवसाढवळ्या एका कुटुंबावर गोळीबार; 1 जण ठार

Posted by - December 7, 2023 0
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथे चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या ज्युनिअर अभिनेत्याने (TV Actor Bhupinder Singh) दिवसाढवळ्या कुटुंबावर गोळीबार केल्याची…
Raigad News

Raigad News : खळबळजनक !1500 किलो जिवंत जिलेटीन आणि 70 किलो डेटोनेटर जप्त

Posted by - December 24, 2023 0
रायगड : रायगड जिल्ह्यातून (Raigad News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये पोलिसांनी रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त…

सुट्टीसाठी कायपण;पोलीस कर्मचाऱ्यांनं लिहलेलं पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Posted by - June 2, 2022 0
पुणे तिथे काय उणे. अशीच काहीशी प्रचिती पुण्यात घडली आहे. पुण्यातील खडक पोलीस स्टेशन येथे सेवेत रुजू असलेल्या एका पोलीस…
Buldhana News

Buldhana News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालक आणि वाहकाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - February 24, 2024 0
बुलढाणा : राज्यात अपघाताचे प्रमाण (Buldhana News) मोठ्या प्रमाणात वाढले आहे. समृद्धी महामार्गावर अशीच एक भीषण अपघाताची घटना समोर आली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *