Worli Hit and run | जुहू मधील बारमध्ये मद्य सेवन, नशेत लॉन्ग ड्राईव्ह अन् वरळीत अपघात… वाचा अपघाता आधीचा संपूर्ण घटनाक्रम

409 0

Worli Hit and run | जुहू मधील बारमध्ये मद्य सेवन, नशेत लॉन्ग ड्राईव्ह अन् वरळीत अपघात… वाचा अपघाता आधीचा संपूर्ण घटनाक्रम

पुण्यातील हाय प्रोफाईल पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर असंच एक प्रकरण वरळीत देखील घडले आहे. मच्छी आणण्यासाठी बाजारात गेलेल्या दुचाकीस्वार पती-पत्नीला मागून आलेल्या बीएमडब्ल्यू गाडीने जोरदार धडक दिली. ज्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी आहेत. तरीही बीएमडब्ल्यू गाडी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा चालवत असल्याची शक्यता आहे. याप्रकरणी राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नेमकं काय घडलं ?

वरळीतील ॲट्रिक मॉल जवळ सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. रविवार असल्यामुळे सकाळी मच्छी आणण्यासाठी बाजारात निघालेल्या पती-पत्नीच्या दुचाकीला भरधाव वेगात आलेल्या बीएमडब्ल्यू कारने धडक दिली. या कारने महिलेला जागीच चिरडले ज्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तिचे पती हे गंभीर जखमी आहेत. अपघात झाल्यानंतर शिवसेना उपनेते राजेश शहा यांचा 24 वर्षीय मुलगा मिहीर शहा हा ड्रायव्हरसह फरार झाला आहे.

अपघाता पूर्वीचा घटनाक्रम काय ?

प्राथमिक माहितीनुसार राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा हा रात्री जुहू येथील प्रसिद्ध बारमध्ये गेला होता. त्या ठिकाणी त्याने मद्य प्राशन केले. त्यानंतर तो गोरेगावला गेला. पुढे घरी गेल्यानंतर त्याने आपला ड्रायव्हर राजरुपी राजेंद्र सिंग बिडावत याला जायचे असल्याचे सांगितले. व ड्रायव्हर सह गाडी घेऊन मिहीर शहा बाहेर पडला. लॉंग ड्राईव्ह साठी तो मुंबईत आला आणि पुन्हा गोरेगावला परतत असताना वरळीत हा भीषण अपघात झाला. अपघाता वेळी गाडीत मिहीर आणि ड्रायव्हर हे दोघेही होते. या सर्व प्रवासादरम्यान मिहीर शहाने मद्य प्राशन केल्यामुळे तो नशेत होता. अपघात घडला त्यावेळी गाडी देखील मिहीर चालवत असल्याची शक्यता आहे. अपघात झाल्यानंतर मिहीर ड्रायव्हर सह फरार झाला आहे. तसेच सकाळपासून त्याचा फोनही बंद लागत आहे. याप्रकरणी राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास आणि मिहीरचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

Share This News

Related Post

Sharad-Pawar-vs-Ajit-Pawar

‘राष्ट्रवादी कुणाची’; केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणीला सुरुवात

Posted by - October 6, 2023 0
आज निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाबाबतची पहिली सुनावणी पार पडत आहे सुनावणीला आता सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही…

Maharashtra Politics : शिवसेनेला आणखीन एक मोठा धक्का ;रामदास कदम यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र…!

Posted by - July 18, 2022 0
Maharashtra Politics : शिवसेनेला आणखीन एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेतील नेत्यांचे पक्ष सोडण्याचे सत्र सुरूच आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते…
Crime Video

Crime Video : कारवरील नियंत्रण सुटल्याने 14 वर्षाच्या मुलाने वृद्ध व्यक्तीला चिरडले

Posted by - September 18, 2023 0
मुंबई : मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना (Crime Video) घडली आहे. यामध्ये एका 14 वर्षाच्या मुलाने वृद्ध व्यक्तीला चिरडले आहे. मुंबईतील…
Chandrapur News

Chandrapur News : खळबळजनक ! घात कि अपघात ? दोन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या तरुणाचा अचानक आढळला मृतदेह

Posted by - October 26, 2023 0
चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur News) जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. चंद्रपूर शहरात अनेक प्राचीन वास्तू आहेत. या वास्तू…

उद्योगांशी संबंधित धोरणातच भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या शिक्षण-प्रशिक्षणाचा समावेश करा

Posted by - May 8, 2022 0
राज्याचे उद्योगाचे धोरण हे भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देणारे असावे. यासाठी या धोरणातच शिक्षण -प्रशिक्षणाचा समावेश राहील यासाठी उच्च व…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *