विद्यापीठात लवकरच ड्रोन विषयक विविध अभ्यासक्रम; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘ड्रोनआचार्य एरियल’ सोबत सामंजस्य करार

225 0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ड्रोनविषयक अभ्यासक्रमांना सुरुवात केली जाणार आहे. यामध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम, पदवी, पदविका अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकताच ड्रोन तंत्रज्ञान विषयातील ड्रोनआचार्य या कंपनीसोबत सामंजस्य करार केला असून या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.महेश काकडे, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, प्रसेनजीत फडणवीस, महाराष्ट्र लोकसेवा आयोग सदस्य डॉ.सतीश देशपांडे , विद्यापीठ सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.आदित्य अभ्यंकर, इनोव्हेशन सेलचे प्रमुख डॉ. संजय ढोले, कॅप्टन चंद्रशेखर चितळे, ड्रोन आचार्यचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक प्रतीक श्रीवास्तव, सतीश कुलकर्णी, सुहास सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.

ड्रोनचा वाढता उपयोग लक्षात घेता भविष्यात या विषयात अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात असे सांगत डॉ.अभ्यंकर म्हणाले, ड्रोन तंत्रज्ञानातील केवळ ड्रोन पायलट प्रशिक्षणच नाही तर ड्रोन बिल्डिंग, ड्रोन रेपेरींग अँड मेंटेनन्स, ड्रोन डेटा प्रोसेसिंग, ड्रोन्स फॉर डिझास्टर मॅनेजमेंट, कृषी नियोजन करण्यासाठी ड्रोनचा वापर आणि कोडिंग आदी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जातील. विद्यार्थ्यांच्या प्रतिसादानुसार हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रमांवर भर देण्यात आला आहे असेही डॉ.अभ्यंकर यांनी सांगितले.

या विषयाची अधिक माहिती पुढील काळात तंत्रज्ञान विभागाच्या संकेस्थळावर जाहीर केली जाईल, असेही डॉ.अभ्यंकर यांनी सांगितले.

Share This News

Related Post

devendra-fadnavis

देवेंद्र फडणवीस यांची यशस्वी शिष्टाई; महावितरणचा संप मागे

Posted by - January 4, 2023 0
महाराष्ट्र वीज उद्योगांच्या खाजगीकरण विरोधात बहात्तर तास संप करण्याचा निर्णय महावितरणच्या वतीने घेण्यात आला होता मात्र त्यावर महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री तथा…

राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक ; हृदयविकाराचा झटका आल्याने एम्स रुग्णालयात उपचार सुरू

Posted by - August 11, 2022 0
विनोद वीर राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते आहे. काल ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना त्यांना अचानक चक्कर…

सुभाष जगताप यांच्यावरील गुन्ह्याचा जिल्हा मातंग समाजातर्फे निषेध, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Posted by - June 6, 2022 0
पुणे- पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते, माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्यावरील दाखल झालेल्या गुन्ह्याचा निषेध करण्यासाठी जिल्हा मातंग समाजातर्फे निषेध…

पुण्यातील भवानी पेठेत स्फोट; कोणतीही जीवितहानी नाही

Posted by - June 12, 2022 0
पुण्यातील भवानी पेठमधील एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भवानी पेठमधील विशाल सोसायटीमध्ये एक किरकोळ ब्लास्ट झाला आहे. यात कोणतीही…

पुण्यात पुन्हा हिट अँड रन: अलिशान कारनं दिलेल्या धडकेत 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Posted by - October 11, 2024 0
पुण्यातील कल्याणी नगर भागात घडलेल्या पॉर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच आता पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातूनच पुन्हा एकदा हिट अँड…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *