पुण्यातील कल्याणी नगर भागात घडलेल्या पॉर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच आता पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातूनच पुन्हा एकदा हिट अँड रन ची घटना उघडकीस आली आहे.
पुण्यातील प्रसिद्ध कोरेगाव पार्क परिसरामध्ये हिट अँड रनचा हा भयानक प्रकार घडला आहे. भरधाव वेगाने आलेल्या आलिशान कारने एका बाईकस्वाराल धडक देत चिरडलं आणि त्या तरूणाला तसंच मृत्यूच्या दारात सोडून तो कारचालक तिथीन तोंड लपवून पळून गेला. या अपघातामध्ये 21 वर्षांच्या एका डिलीव्हरी बॉयचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील गुगल बिल्डींग समोर गुरुवारी मध्यरात्री 1च्या सुमारास हा अपघात घडला. रौफ अकबर शेख असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. हा अपघात घडला तेव्हा कारचालक हा दारूच्या नशेत असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी कारचालकाचा शोध सुरू केला. अखेर अथक प्रयत्नांनी त्याला ताब्यात घेण्यात आलं.