NANA PATOLE : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे भाजपाचे नियोजित षडयंत्र !

287 0

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याची भारतीय जनता पक्षात चढाओढच लागल्याचे दिसत आहे.

मागील महिनाभरात भाजपाच्या चार-पाच नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी वक्तव्ये केली आहेत. हे प्रकार अनवधानाने झालेले नसून भाजपाने छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करण्याचे जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरींचे गुनगाण गाण्याच्या नादात त्यांची तुलना शिवाजी महाराजांशी करून महाराज आता जुने आदर्श झाले असून गडकरी नवे आदर्श आहेत असे वक्तव्य करून महाराजांचा घोर अपमान केला. त्यानंतर भाजपाचा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांनी महाराजांनी औरंगजेबाची पाचवेळा माफी मागितली असे निर्लज्ज वक्तव्य केले. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना राजकीय बंडखोरीशी केली. तर आमदार प्रसाद लाड यांनी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचा जावई शोध लावला.

एवढ्यावरच हे थांबले नाही तर आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे. याआधी छिंदम नावाच्या भाजपाच्या नेत्यांनेही असेच दिवे लावले होते. यामध्ये एक समान धागा आहे आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे हे सर्वजण भारतीय जनता पक्षाचेच आहेत. महापुरुषांचा अपमान करणे, त्यांची बदनामी करणे यात भारतीय जनता पक्षाला काहीच वाटत नाही. राजरोसपणे अशी अपमान करणारी वक्तव्ये होत असताना या विधानांचा तीव्र शब्दात निषेध करून कारवाई करणे अपेक्षित होते पण भारतीय जनता पक्षाने तसे काहीही केले नाही उलट सारवासारव करण्यात आली.

भारतीय जनता पक्ष नितिमत्ता नसलेला पक्ष झाला आहे. महापुरुषांचा अवमान करण्याचे धाडस हे सत्तेची गुर्मी चढल्याने असून महाराष्ट्राची जनता आपल्या दैवतांचा अपमान कदापी सहन करणार नाही व भाजपाच्या या बेताल लोकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असंही नाना पटोले म्हणाले

Share This News

Related Post

Karuna Sharma

Karuna Sharma : करुणा शर्मा यांनी बावनकुळेंची भेट घेत केली ‘ही’ मोठी मागणी

Posted by - June 30, 2023 0
बीड : करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली आहे.…

आश्चर्यकारक ! चीनच्या लोकसंख्येत प्रथमच घट ! भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिक ?

Posted by - January 19, 2023 0
चीन : जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या चीनच्या लोकसंख्येत 2022 मध्ये 8 लाख 50 हजार एवढी घट झाली आहे. 1961…

दसरा मेळावा : सप्तशृंगी मातेची प्रतिमा उध्दव ठाकरेंना भेट देऊन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या घवघवीत यशासाठी शुभेच्छा

Posted by - October 6, 2022 0
मुंबई : नवरात्रीच्या निमित्ताने शिवसेना उपनेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेतून ”साडेतीन शक्तीपीठाच्या दर्शनानिमित्त बये दार उघड” मोहिम आयोजित केली होती.…
Vijender Singh

Vijender Singh : बॉक्सर विजेंदर सिंगचा भाजपमध्ये प्रवेश

Posted by - April 3, 2024 0
आंतरराष्ट्रीय बॉक्सर विजेंदर सिंहने (Vijender Singh) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे महासचिव विनोद तावडे यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये हा पक्षप्रवेश पार…

शितल…..तू लढ आम्ही सगळ्या तुझ्या सोबत आहोत ! ‘त्या’ व्हिडीओ प्रकरणी चित्र वाघ यांचे म्हात्रेंसाठी ट्विट

Posted by - March 13, 2023 0
मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्रातून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत. विशेष म्हणजे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *