Murder Mystery : अपहरण करून खून झालेल्या ‘त्या’ वकिलाचे मारेकरी सापडले

374 0

पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयातून अपहरण करून खून झालेल्या पिंपरी-चिंचवडमधील ‘त्या’ वकिलाच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात आली. 31 डिसेंबर रोजी काळेवाडीतील उच्च न्यायालयाचे वकील शिवशंकर शिंदे यांचं अपहरण करून खून करण्यात आला होता.

वकील शिवशंकर शिंदे यांचं अपहरण करून त्यांचा खून केल्याप्रकरणी फरार असलेल्या राजेश्वर गणपत जाधव, सतीश माणिकराव इंगळे आणि बालाजी मारुती एलनवर या तीन आरोपींना अटक करण्यात पिंपरी-चिंचवडच्या गुंडाविरोधी पोलिस पथकाला अखेर यश आलं. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, यातील मुख्य आरोपी राजेश्वर जाधव याच्या घटस्फोटाच्या प्रकरणाचं कामकाज वकील शिवशंकर शिंदे पाहात होते.

दरम्यानच्या काळात आपल्या पत्नीचे वकील शिवशंकर शिंदे यांच्याशी विवाहबाह्य अनैतिक संबंध सुरू असल्याचा संशय राजेश्वर जाधव याला आला आणि त्यातूनच त्यांनी 31 डिसेंबरच्या संध्याकाळी वकील शिवशंकर शिंदे यांचं त्यांच्या काळेवाडी येथील ऑफिसमधून एका टेम्पोतून अपहरण केलं आणि खून केला. त्यानंतर तेलंगणा राज्यातील कामारेड्डी जिल्ह्यातील चिन्नमा कोरी मंदिराजवळ त्यांचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट केला, असं पोलीस तपासात निष्पन्न झालं. वाकड पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

धक्कादायक : प्रेमात झाले किरकोळ वाद; प्रेयसीवर केला थेट धारदार शस्त्राने वार, पुण्यात थरार

Posted by - November 9, 2022 0
पुणे : पुणे पुन्हा एकदा एका भयंकर हत्याकांडानं हादरल आहे. पुण्यातील औंध परिसरात राहणाऱ्या एका तरुणीचा तिच्या प्रियकरानं धारदार शस्त्राने…

भटकंती : पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजे ‘कास पठार’ ! या वातावरण फुलांना आलेला बाहेर पाहून मन होईल तृप्त …

Posted by - October 6, 2022 0
कासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणपणे २२ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील कास तलाव सातारा शहराला पाणीपुरवठा करतो. या पठारावर पावसाळा…

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवार आज साक्ष नोंदवणार, सह्याद्री अतिथीगृहात दाखल

Posted by - May 5, 2022 0
मुंबई- भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज साक्ष नोंदवली जाणार आहे. साक्ष नोंदवण्यासाठी शरद पवार सह्याद्री…

TOP NEWS MARATHI : आंबेडकरी चळवळीच्या प्रा. अंधारे यांनी शिवबंधन का बांधले ? ‘समोरासमोर’मध्ये प्रा. सुषमा अंधारे (Video)

Posted by - August 1, 2022 0
TOP NEWS MARATHI : फुले आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध वक्त्या प्राध्यापिका सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना-भाजप…

गृहिणींसाठी खास टिप्स : तांदूळ जुना आहे की नवीन कसा ओळखावा…?

Posted by - August 16, 2022 0
किचन टिप्स : घरामध्ये कोणतीही वस्तू खरेदी करत असताना त्याची शुद्धतेची पडताळणी प्रत्येक दक्ष गृहिणी करताच असते . पण तांदूळ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *