Team India

Asian Games 2023: आशियाई खेळांसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ यंगस्टारकडे देण्यात आली कर्णधारपदाची धुरा

1324 0

मुंबई : बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने 19 व्या एशियन गेम्स स्पर्धेसाठी (Asian Games 2023) टीम इंडियाचा संघ जाहीर केला आहे. बीसीसीआयने 15 सदस्यीय मुख्य संघ जाहीर केला आहे. या संघात (Asian Games 2023) 4 जणांना राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे. बीसीसीआयने शुक्रवारी 14 जुलै रोजी रात्री उशिरा ट्विट करून याची माहिती दिली आहे. या संघाची धुरा पुण्याचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड सांभाळणार आहे. या संघात बीसीसीआयने आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी दिली आहे. ही स्पर्धा टी 20 फॉर्मेटमध्ये खेळवण्यात येणार आहे.

कधी खेळवली जाणार ही स्पर्धा?
एशियन गेम्स ही स्पर्धा (Asian Games 2023) 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान खेळण्यात येणार आहे. या स्पर्धेचं आयोजन हे चीनमध्ये करण्यात आले आहे. एशियन स्पर्धेचं चीनमध्ये आयोजन करण्याची ही तिसरी वेळ आहे. तसेच या स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्याची देखील तिसरीच वेळ आहे. याअगोदर एशियन गेम्समध्ये 2014 आणि 2010 मध्ये क्रिकेट खेळाला स्थान देण्यात आलं होतं.

कोणत्या खेळाडूवर कोणती जबाबदारी?
युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड या संघाचे नेतृत्व करणार आहे. अर्शदीप सिंह, शिवम मावी, आवेश खान आणि मुकेश कुमार या चौघांकडे वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे. तर फिरकी गोलंदाजीची धुरा ही रवी बिश्नोई आणि शहबाज अहमद याच्यांकडे असेल. तसेच संघात ऑलराउंडर म्हणून वॉशिंग्टन सुंदरची निवड करण्यात आली आहे.

19 व्या एशियन गेम्ससाठी टीम इंडियाचा संघ
ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे आणि प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर)

राखीव खेळाडू : यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा आणि साई सुदर्शन

Share This News

Related Post

Sania Mirza and Shoaib Malik

Sania Mirza and Shoaib Malik : टेनिस स्टार सानिया मिर्झाने शोएब मलिकला दिलेल्या ‘खुला’चा अर्थ नेमका काय आहे?

Posted by - January 21, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने (Sania Mirza and Shoaib Malik) तिसऱ्यांदा पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न…
Team India

Cricketers Retirement : खळबळजनक ! एकाचवेळी ‘या’ 5 क्रिकेटर्सने केली निवृत्तीची घोषणा

Posted by - February 20, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रीडा विश्वातून एक खळबळजनक (Cricketers Retirement) बातमी समोर आली आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी…
Bajarang Punia

Bajarang Punia : साक्षी मलिकच्या निवृत्तीनंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने घेतला पद्मश्री परत करण्याचा निर्णय

Posted by - December 22, 2023 0
मुंबई : क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक (Bajarang Punia) जिंकवून देणाऱ्या कुस्तीपटू साक्षी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *