Punit Balan Group

Punit Balan group : पुनीत बालन ग्रुपच्या अर्जुन कढे आणि अंकिता गोसावींना शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार जाहीर

583 0

पुणे : राज्य शासनाच्या शिवछत्रपती क्रिडा पुरस्कारांमध्ये पुनीत बालन ग्रुपच्या दोन खेळांडुचा समावेश आहे. यामध्ये 2019-20 या वर्षांच्या पुरस्कारासाठी अ‍ॅथलेटिक्स क्रिडा प्रकारात अंकिता गोसावी आणि 2021-22 या वर्षासाठी लॉन टेनिसपट्टू अर्जुन कढे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून खेळांडुना खेळांसाठी सर्वोतोपरीचे सहकार्य केले जाते. अनेक खेळांडुंशी या ग्रुपने सहकार्य करार केला असून त्यातंर्गत या खेळांडुना आर्थिक सहकार्य, क्रिडा मार्गदर्शक, परदेशात तसेच देशातंतर्गत स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रवास सुविधा, आरोग्य सुविधा, आहार अशा पध्दतीची सर्वोतोपरी मदत केली जाते. त्यामध्ये लॉन टेनिसपटू अर्जुन कढे आणि अ‍ॅथलेटिक्स पट्टू अंकिता गोसावी हे दोघेही खेळाडु पुनीत बालन ग्रुपचे आहेत. या दोघांनाही त्यांच्या खेळांसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची मदत या ग्रुपकडून केली जाते. राज्य शासनाने नुकतेच सलग तीन वर्षांच्या शिवछत्रपती क्रिडा पुरस्कारांची घोषणा केली. त्यात या दोन्ही खेळांडुंना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

याबाबत बोलताना अर्जुन कढे याने ‘पुनीत बालन यांच्या सहकार्यामुळेच मी या पुरस्कारासाठी पात्र ठरलो. त्यांचा सपोर्ट असल्यामुळे आपल्या मागे कोणीतरी खंबीरपणे उभे आहे असे वाटते. त्यामुळे माझ्या खेळावर पुर्णपणे लक्ष केंद्रित करता आले. मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या पाठिंब्यांवरच पुढील वर्षी ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत मी खेळणार आहे.’ तर अंकिता गोसावी म्हणाली, ‘मी मध्यमवर्गीय कुंटुंबातील असल्याने स्पर्धांसाठीचा खर्च, आहार, साहित्य घेणे जिकरीचे ठरते. मात्र, पुनीत बालन ग्रुपच्या मदतीमुळे मला हे सर्व शक्य होत आहे. त्यामुळे मला खुप मोठा आधार मिळाला. त्यांचे आभार शब्दात व्यक्त करता येणार नाही’ अशी माझी भावना आहे.

महाराष्ट्र शासनाचा क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च असलेला शिवछत्रपती पुरस्कार अंकिता आणि अर्जुन यांना जाहिर झाल्याचा मनस्वी आनंद झाला आहे. हे दोन्हीही खेळाडु प्रतिभावंत आहे. पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्या खेळांसाठी अशीच सर्वोतोपरी मदत केली जाईल.
पुनीत बालन, अध्यक्ष.

Share This News

Related Post

T20 World Cup : शोएब अख्तर म्हणे,”पुढच्या आठवड्यात भारतीय टीमची बॅकपॅक होईल…!” पहा VIDEO

Posted by - October 28, 2022 0
पाकिस्तान : T20 वर्ल्ड कप मधून पाकिस्तानला अत्यंत निराशा पदरी पडली आहे. पराभवामुळे पाकिस्तानी चाहते संतापले आहेत. झिंबावे सारख्या टीमने…

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी

Posted by - July 26, 2022 0
पुणे : पुणे जिल्ह्यातील १९ ग्रामपंचातीच्या सार्वत्रिक निवडणूकीचे मतदान व मतमोजणी शांततामय वातावरणात व सुरळीतपणे पार पाडण्याच्यादृष्टीने जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेश देशमुख…

मोठी बातमी! बहुचर्चित लवासा प्रकरणी पवार कुटुंबियांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

Posted by - August 8, 2022 0
पुणे: पुण्यातील बहुचर्चित लवासा प्रकरणासंदर्भात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली होती. या निर्णयाविरोधात याचिका करते नानासाहेब…

उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्या पीएशी ओळख असल्याचे सांगून १० लाखांची फसवणूक

Posted by - March 2, 2022 0
पुणे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकांच्या नावाने १० लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या दोन युवकांच्या विरोधात…

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 15 हजार सामूहिक सूर्यनमस्कारने वंदन ; VIDEO

Posted by - September 2, 2022 0
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर पुण्यातील शालेय विद्यार्थ्यांनी 15 हजार सामूहिक सूर्यनमस्कारने आज बाप्पाला वंदन केले. लक्ष्मी वेंकटेश…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *