उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्या पीएशी ओळख असल्याचे सांगून १० लाखांची फसवणूक

237 0

पुणे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकांच्या नावाने १० लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या दोन युवकांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

प्रवीण विठ्ठल जगताप (रा.वाई, सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्या अन्य एका साथीदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महेश विश्वास पटवर्धन (42,राजयोग सोसायटी, वारजे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव भूषण गगराणी यांचे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकांची ओळख आहे. तुमचे काम करून देतो असे सांगून आरोपींनी महेश पटवर्धन यांची फसवणूक केली.

पुणे महापालिकेमार्फत विविध विकास कामे केली जातात. त्यापैकी ५ कोटी रुपयांचे बजेट लॉकिंग करून देतो, माझी मुसळे यांच्याशी ओळख आहे. तुमचे काम होऊन जाईल, असे स्वत:ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकाशी ओळख असल्याचे सांगणारा आरोपी प्रवीण विठ्ठल जगताप आणि त्याच्या एका साथीदाराने फिर्यादी महेश पटवर्धन याला सांगितले. त्या बरोबरच भूषण गगराणी यांचे पीए हेमंत केसळकर यांच्याशीही ओळख असल्याचे त्याने पटवर्धन यांना सांगितले.

परंतु पैसे देऊनही काम करत नसल्याचे पाहून पटवर्धन यांनी बंडगार्डन पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानंतर आरोपी प्रवीण जगताप याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास बंडगार्डन पोलिस करत आहेत.

Share This News

Related Post

Pune Crime

Pune Crime : पुणे हादरलं ! शिक्षीका पत्नीचा खून करून दोन मुलांना विहरीत टाकून डॉक्टर पतीची आत्महत्या

Posted by - June 20, 2023 0
दौड : पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) दौंड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका डॉक्टरने आपले अख्ख कुटूंबंच…
Vijay Shivtare

Vijay Shivtare : 12 तारखेला 12 वाजता फॉर्म भरून 12 वाजवणार! शिवतारें आपल्या निर्णयावर ठाम

Posted by - March 24, 2024 0
बारामती : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. महाराष्ट्रात तर या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.…

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विसर्जन ; फुलांची उधळण, कोल्ड फायरची विद्युत अतिशबाजी आणि ढोल ताशाचा दणदणाट

Posted by - September 10, 2022 0
पुणे : आकर्षक फुलांनी सजलेला पारंपरिक रथ त्यावर उभारलेला पुष्प रणशिंग चौघडा, रथावर होणारी कोल्ड फायरची विद्युत आतिषबाजी आणि सोबतीला…

राष्ट्रीय ‘नारी शक्ती पुरस्कार’ विजेत्यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

Posted by - March 8, 2022 0
राष्ट्रीय स्तरावरील ‘नारी शक्ती पुरस्कार’ विजेत्या महाराष्ट्रातल्या तीन महिलांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. आंतरराष्ट्रीय महिलादिनी आज (8…

मनसे लोकसभा निवडणूक लढवणार; या नावांवर झालं शिक्कामोर्तब?

Posted by - October 7, 2023 0
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा लोकसभेच्या मैदानात उतरणार आहे. मनसेकडून पुणे ठाणे व…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *