Pune News

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांच्या महाविजय संकल्प सभेचे आयोजन

297 0

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pune News) यांची पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाविजय संकल्प सभेचे आयोजन येत्या 29 एप्रिल रोजी वानवडी येथील रेस कोर्स मैदान येथे सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी करण्यात आले आहे. या सभेला महायुतीचे दोन लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी माहिती प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी दिली आहे.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसनेचे शहर प्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख संजय भोसले, मनसेचे अध्यक्ष साईनाथ बाबर, आरपीआयचे अध्यक्ष संजय सोनावणे, पुणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, महायुती समन्वयक संदीप खर्डेकर, राजेंद्र शिळिमकर आदी उपस्थित होते. यावेळी पांडे म्हणाले, अनेक वर्षानंतर पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत असून रेसकोर्स याठिकाणी सभेचे आयोजन केले आहे. सभेच्या माध्यमातून महायुतीच्या चारही उमेदवारांची ही महाविजय संकल्प सभा असणार आहे.128 एकरांमध्ये ही सभा होणार असून या सभेला 2 लाख नागरिक उपस्थित राहणार आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, मनसे, आरपीआय यांच्याबरोबर सर्व सहकारी पक्ष सभेच्या तयारीला लागले आहेत. 21 विधानसभा मतदारसंघामधून सभेसाठी कार्यकर्ते येणार असल्याचे पांडे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्यासह 3 हजार व्हीआयपी यासभेला उपस्थित राहणार आहेत. सभेसाठी आठ ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना समाज माध्यमातून गुगल लिंक पाठवण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांचे पार्किंग कोठे आहे ते त्यांना समजेल. कार्यकर्त्यांनी येताना पाण्याची बाटली आणू नये. पाण्याची सोय मैदानात करण्यात आली आहे. 22 ठिकाणी एलइडी लावण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदी येण्यापुर्वी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व दरवाजे बंद करण्यात येतील. त्यामुळे नागरिक आणि कार्यकर्त्यांनी 4 वाजून 30 मिनिटापर्यंत सभेच्या ठिकाणी पोहचावे असे पांडे यांनी सांगितले. त्याचबरोबर या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी नरेंद्र मोदी कराडची सभा संपवून डायरेक्ट लँड करणार आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Satara Loksabha : ‘…तरी शरद पवारांची साथ सोडणार नाही’ शशिकांत शिंदेंनी विरोधकांना ठणकावून सांगितलं

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

Ujjwal Nikam : मुंबई उत्तर मध्य मधून भाजपकडून उज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर

Raju Shetti : कांद्यावरील निर्यातबंदी हटवल्यानंतर राजू शेट्टींनी शेतकऱ्यांना केले ‘हे’ आवाहन

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा जखमी

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

WhatsApp News : ‘या’ 5 चुका करणे टाळा; अन्यथा तुमचे व्हॉट्सअ‍ॅप होईल बॅन

Onion Export : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! कांदा निर्यातीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Election Commission : निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला मोठा धक्का! ‘तो’ अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळला

Maharashtra Politics : छ. संभाजीनगरमध्ये महायुतीला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने भरला अपक्ष अर्ज

Naseem Khan : काँग्रेस नेते नसीम खान यांनी तडकाफडकी स्टार प्रचारकपदाचा दिला राजीनामा

Hingoli News : कूलरची हवा बेतली जीवावर !14 वर्षीय विद्यार्थ्यांला गमवावा लागला जीव

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पहाटेच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्सला भीषण आग

Share This News

Related Post

पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला

Posted by - August 4, 2024 0
पुणे: पुणे शहर व आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून यामुळे खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. खडकवासला धरणाच्या…
Shrinath Bhimale

Shrinath Bhimale : पुणे लोकसभेच्या भाजपा समन्वयकपदी श्रीनाथ भिमाले यांची नियुक्ती

Posted by - September 14, 2023 0
पुणे : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या ‘महाविजय 24’ या अभियानाच्या पुणे लोकसभा समन्वयकपदी महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले…

‘ त्या ‘ वादग्रस्त पोलीस निरीक्षकाची अखेर उचलबांगडी ; महिलेच्या तक्रारीनंतर पुणे पोलीस आयुक्तांची कारवाई

Posted by - August 18, 2022 0
पुणे : गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली आहे . राजेश पुराणिक…
Sharad Pawar Shirur

Sharad Pawar : शरद पवारांकडून मुख्यमंत्री, दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांना स्नेह भोजनाचे निमंत्रण

Posted by - February 29, 2024 0
पुणे : बारामतीत नमो रोजगार मोळाव्याचे आयोजन (Sharad Pawar ) करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…

महात्मा फुले जयंतीनिमित्त पुणे शहरात पीएमपीएमएलची विशेष बससेवा

Posted by - April 8, 2023 0
महात्मा फुले जयंती निमित्त मंगळवार दि. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले वाडा येथे येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता, पुणे महानगर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *