पुणे : बिबवेवाडी येथील ईएसआयसी अर्थात कामगार विमा रुग्णालयात 100 बेडचे सुसज्ज रुग्णालय कार्यान्वित झाले असून 16 एकर जागेतील सात मजली इमारतीत 500 खाटांचे सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज विस्तारीत रुग्णालयाचे काम नजिकच्या काळात पूर्ण होईल. त्यामुळे पर्वती, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, असे मत भाजप महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
पर्वती विधानसभा मतदारसंघातील आंबेडकर नगर, आदिनाथ सोसायटी, प्रेमनगर, गंगाधाम, मार्केट यार्ड बस डेपो, महेश सोसायटी, चिंतामणीनगर, अप्पर इंदिरानगर आदी परिसरात मोहोळ यांच्या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सुनील कांबळे, समन्वयक श्रीनाथ भिमाले, दीपक मिसाळ, राजेंद्र शिळीमकर, मानसी देशपांडे, रुपाली धाडवे, वर्षा साठे, कविता वैरागे, राजश्री शिळीमकर, प्रविण चोरबोले, अनुसया चव्हाण, प्रशांत दिवेकर, शिवसेना नेते सुधीर कुरूमकर, नितीन लगस, श्रीकांत पुजारी, अविनाश खेडेकर, राष्ट्रवादीचे संतोष नांगरे, श्वेता होनराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोहोळ म्हणाले, ‘ससूनच्या धर्तीवर रुग्णालय उभारू अशी घोषणा काँग्रेसकडून अनेक वर्षे केली गेली. पण ती कधीही प्रत्यक्षात आली नाही. आमदार माधुरी मिसाळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने केंद्र शासन हे रुग्णालय उभारत आहे. नव्या प्रशस्त रुग्णालयात अतिदक्षता विभाग, बाह्यरूग्ण कक्ष, सुपर स्पेशालिटी सुविधांसाठी स्वतंत्र कक्ष, साधारण व अतिदक्षता विभागाचे कक्ष असतील. रेडिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळांचा समावेश असेल. पुढील दोन वर्षांत बांधकाम पूर्ण होईल.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांच्या महाविजय संकल्प सभेचे आयोजन
Satara Loksabha : ‘…तरी शरद पवारांची साथ सोडणार नाही’ शशिकांत शिंदेंनी विरोधकांना ठणकावून सांगितलं
Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन
Ujjwal Nikam : मुंबई उत्तर मध्य मधून भाजपकडून उज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर
Raju Shetti : कांद्यावरील निर्यातबंदी हटवल्यानंतर राजू शेट्टींनी शेतकऱ्यांना केले ‘हे’ आवाहन
Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा जखमी
Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस
WhatsApp News : ‘या’ 5 चुका करणे टाळा; अन्यथा तुमचे व्हॉट्सअॅप होईल बॅन
Onion Export : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! कांदा निर्यातीबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Election Commission : निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला मोठा धक्का! ‘तो’ अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळला
Naseem Khan : काँग्रेस नेते नसीम खान यांनी तडकाफडकी स्टार प्रचारकपदाचा दिला राजीनामा
Hingoli News : कूलरची हवा बेतली जीवावर !14 वर्षीय विद्यार्थ्यांला गमवावा लागला जीव
Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पहाटेच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्सला भीषण आग