Naseem Khan

Naseem Khan : काँग्रेस नेते नसीम खान यांनी तडकाफडकी स्टार प्रचारकपदाचा दिला राजीनामा

311 0

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, संजय निरुपम आणि अशोक चव्हाण या तीन बड्या नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली होती. हे तिघेही नेते काँग्रेस पक्षाचा मुंबईतील चेहरा म्हणून ओळखले जात होते. या धक्क्यातून संघटना सावरत नाही तोच आता काँग्रेस नेते नसीम खान यांनी तडकाफडकी स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला आहे.

नसीम खान हे उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छूक होते. मात्र, याठिकाणी काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नसीन खान हे प्रचंड नाराज झाले आहेत. लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असताना नसीम खान यांनी पक्षाच्या प्रचार समिती आणि स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Hingoli News : कूलरची हवा बेतली जीवावर !14 वर्षीय विद्यार्थ्यांला गमवावा लागला जीव

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पहाटेच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्सला भीषण आग

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!