Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : पुणे महापालिकेने करावयाच्या पावसाळा पूर्व कामांसंदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्तांना दिले निवेदन

490 0

पुणे : गेल्या आठवड्याभरात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शहराच्या विविध भागांतील रस्ते जलमय होत आहेत. त्यामुळेच महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी करावयाची 90 टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा चुकीचा आणि पुणेकरांची दिशाभूल करणारा वाटतो. आपण स्वतः प्रशासनासह नाल्यांवर जाऊन प्रत्यक्ष पाहाणी करावी, अशी विनंती आम्ही या निवेदनाद्वारे करीत आहोत.

शहर आणि उपनगरातील नाले सफाई, कल्व्हर्ट आणि पावसाळी गटारांच्या सफाईच्या कामांची मुदत 15 मे पर्यंत निश्चित करण्यात आली होती. आतापर्यंत 90 टक्के पावसाळी कामे पूर्ण झाल्याचा दावा नुकताच प्रशासनाने केला. परंतु शहरात मागील आठवड्याभरात झालेल्या पावसाने रस्ते जलमय होत आहेत. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने पुणेकरांची गैरसोय होत आहे. नालेसफाईची कामे योग्य पद्धतीने झाली नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

हवामान खात्याने या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच गेल्या काही वर्षांत कमी वेळात ढगफुटी सदृश्य अधिक पाऊस होत आहे. पावसाळी गटारांची वहनक्षमता कमी असल्याने पाणी वाहून जाण्याला मर्यादा येतात. शहरात पाचशे किलोमीटर लांबीचे छोटे-मोठे ओढे आणि नाले आहेत. या नाल्यांची योग्य प्रकारे साफसफाई झालेली नाही.

या बरोबर पुढील काही उपाययोजना अल्प आणि दीर्घ कालावधीसाठी करणे आवश्यक वाटते, त्याची सविस्तर माहिती द्यावी
1. पावसाचे पाणी वाहून नेणारी पावसाळी गटारे आणि नाले पाचशे किलोमीटरची आहेत. शहराला किमान 800 किलोमीटर लांबीच्या पावसाळी वाहिन्यांची आवश्यकता आहे. त्या बाबत कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत?
2. महापालिकेच्या विविध विभागांमध्ये नालेसफाई आदी पावसाळा पूर्व कामांची स्थिती काय आहे?
3. केंद्र शासनाकडून पुणे शहराला अर्बन फ्लड रिस्क मॅनेजमेंटअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला असल्यास, या योजनेतील कामांची सद्यस्थिती काय आहे?
4. पूरस्थिती निवारणासाठी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, पुणे पोलीस, महामेट्रो, बीएसएनएल आदी विभागातील अधिकारी, पदाधिकारी, अभियंता, अधीक्षक आदींची एकत्रित बैठक घेऊन नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास खबरदारी म्हणून आदर्श कार्यप्रणाली एसओपी तयार केली आहे का?
5. आपत्तीला तोंड देण्यासाठी महापालिकेचा आपत्ती निवारण कक्ष सुसज्ज आहे का आपत्ती निवारण कक्षात कोणकोणत्या सुविधा देण्यात आल्या आहेत, त्यांची सद्यस्थिती काय आहे?
6. संभाव्य पूरस्थितीचा विचार करून शहरात प्रभाग स्तरावर मदत केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे का?
7. पाच वर्षांपूवी ढगफुटी सदृश पावसामुळे आंबिल ओढ्याला पूर आला होता. या परिसरात पूर नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत?
8. राज्य शासनाकडून सीमा भिंतींसाठी प्राप्त झालेल्या 200 कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या विकासकामांची सद्यस्थिती काय आहे?
9. शहरातील पूरस्थितीचा विचार करून 128 ठिकाणांवरील उपाययोजनांचा आराखडा सी-डॅकच्या मदतीने तयार करून 432 कोटी रुपयांचा आपत्ती व्यवस्थापन कामांचा अहवाल राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास सादर करण्यात आला होता. त्याची सद्यस्थिती काय आहे?
10. पावसाळी कोंडीच्या 200 हून अधिक चौकांमध्ये कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत?

वरील सर्व विषय अत्यंत महत्त्वाचे आणि गंभीर असून, या बाबतची माहिती तातडीने देऊन, योग्य त्या उपायययोजना कराव्यात, ही विनंती भाजपचे सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Virat Kohli : फक्त 29 धावा अन् विराट कोहली ठरणार ‘ही’ कामगिरी करणारा पहिला खेळाडू

Chandrapur News : चंद्रपूर हादरलं ! दारू सोडवण्याच्या औषधाने घेतला दोन तरुणांचा जीव

Virat Kohli : खळबळजनक ! राजस्थान विरुद्धच्या सामन्याअगोदर किंग कोहलीला मिळाली धमकी

Pune Accident : मुलाच्या कारनाम्यानंतर अडचणीत आलेल्या बिल्डर विशाल अगरवालला कशी झाली होती अटक?

Vishal Agarwal : विशाल अगरवाल याला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी

Pune News : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर पालिका अ‍ॅक्शन मोडवर; ‘या’ 2 पबवर केली कारवाई

Pune Porsche Accident : पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरात विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न

Pune Accident : मुलाच्या कारनाम्यानंतर अडचणीत आलेल्या बिल्डर राहुल अग्रवालची संपत्ती माहित आहे का?

Crime News : गॅलरीतून पडलेली चिमुकली बचावली मात्र आईने गमावला जीव

SSC Result Date : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी जाहीर होणार 10 वीचा निकाल

Pune Porsche Accident : ‘त्या’ आरोपी मुलामुळे ‘या’ आमदाराच्या मुलाने सोडली होती शाळा

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! येत्या शुक्रवारी पाणीपुरवठा राहणार बंद

Pune Car Accident : अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन; धक्कादायक माहिती आली समोर

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!