Vishal Agrawal

Pune Accident : मुलाच्या कारनाम्यानंतर अडचणीत आलेल्या बिल्डर राहुल अग्रवालची संपत्ती माहित आहे का?

386 0

पुणे : पुणे पोर्शे कार अपघाताप्रकरणी (Pune Accident) पोलिसांनी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह चौघांना अटक केली आहे. विशाल अग्रवाल यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेण्यात आलं होतं.

कोण आहेत विशाल अग्रवाल आणि किती आहे त्यांची संपत्ती?
विशाल अग्रवाल हे पुण्यातील मोठे बिल्डर आहेत. त्यांच्या कंपनीची सुरुवात विशाल यांचे पणजोबा ब्रह्मदत्त अग्रवाल यांनी केली होती. विशाल अग्रवाल यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतल्यानंतर बरीच प्रगती केली होती. ब्रह्मा कॉर्पचे पुण्यात वडगांव शेरी, खराडी आणि विमान नगर परिसरात अनेक मोठे प्रोजेक्ट सुरू आहेत. या कंपनीची संपत्ती 601 कोटी रुपये इतकी आहे. विशाल यांच्या कंपनीने शेरेटन ग्रँड, रेसिडन्सी क्लब सारख्या मोठ्या इमारती बांधल्या आहेत. याशिवाय अग्रवाल कुटुंबियांचे ब्रह्मा मल्टिस्पेस, ब्रह्मा मल्टिकॉनसुद्धा असून त्यांनी शहरात फाइव्ह स्टार हॉटेल्स बांधली आहेत.

विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी विशाल अग्रवाल यांच्यावर कलम 75 आणि 77 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाकडे वाहन चालवण्याचा परवाना नाही हे माहिती असतानाही त्यांनी कार दिल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

‘त्या’ रात्री काय घडले होते ?
पुण्यातील कल्याणी नगर जंक्शन या ठिकाणी रविवारी पहाटे नंबर प्लेट नसलेल्या पोर्श कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दोन आयटी अभियंत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर ज्या पोर्शे कारने दोघांना धडक दिली ती कार विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा चालवत होता.या अपघातानंतर आरोपी मुलाला जमावाने बेदम चोप दिला. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन सुट्टीच्या न्यायालयात हजर केले. न्यायलयाने त्याला अटी व शर्तींवर लगेच जामीन मंजूर केला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Crime News : गॅलरीतून पडलेली चिमुकली बचावली मात्र आईने गमावला जीव

SSC Result Date : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी जाहीर होणार 10 वीचा निकाल

Pune Porsche Accident : ‘त्या’ आरोपी मुलामुळे ‘या’ आमदाराच्या मुलाने सोडली होती शाळा

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! येत्या शुक्रवारी पाणीपुरवठा राहणार बंद

Pune Car Accident : अग्रवाल कुटुंबाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन; धक्कादायक माहिती आली समोर

Share This News

Related Post

Pune Crime : 5 वर्षांपूर्वी घडलेल्या खुनी नाट्याचा थरार ; बहिण-भावानेच केला सख्या भावाचा निघृण खून ; असा झाला उलगडा…

Posted by - August 2, 2022 0
पुणे : बहिण भावाच्या नात्याला काळीमा फासली गेली आहे प्रत्येक घरामध्ये वाद विवाद होतच असतात आई-वडिलांच्या मृत्यू नंतर प्रॉपर्टीच्या होणाऱ्या…

एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे तर्फे 16 ते 18 जून दरम्यान मुंबईत राष्ट्रीय आमदारांच्या परिषदेचे आयोजन

Posted by - November 9, 2022 0
पुणे : संविधान समजून घेऊन राज्य आणि देशाच्या विकासाची कामे करणे, नवीन आमदारांना विकास कल्पना प्रणालीच्या विभागाविषयी संवेदनशील करणे तसेच …

पवारांचा बालेकिल्ला सर करण्यासाठी मनसेची व्यूहरचना; वसंत मोरेंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

Posted by - August 23, 2022 0
पुणे: भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मिशन 45 नुसार काम सुरू केले आहे. भाजप पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा…

पुणे महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग आराखड्यावरील हरकती सूचनांची सुनावणी (व्हिडिओ)

Posted by - February 24, 2022 0
पुणे- आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग आराखड्यावरील सुनावणीला सुरुवात झाली असून पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे…
Pune News

Pune News : शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Posted by - April 12, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली आहे. पुण्याच्या नूमवि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *