रायगड : रायगड लोकसभा मतदारसंघात (Raigad Lok Sabha) महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून शेतकरी कामगार पक्षाचे नेते रमेश मोरे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. रमेश मोरे हे माणगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. लोकसभेच्या तोंडावर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे रायगड मध्ये महायुतीची ताकद वाढली आहे. शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीतील घटक पक्ष असून रमेश मोरे हे माणगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. याठिकाणी त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघ राज्यात कायम चर्चेतला मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ताब्यात असून सुनीट तटकरे सध्या विद्यमान खासदार असून यंदाही महायुतीकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून रायगडमधून अनंत गीते यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात गीते विरुद्ध तटकरे असा सामना रंगणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Nashik Loksabha : अध्यात्मिक गुरु होणार खासदार? नाशिकमध्ये ‘हे’ संत उतरणार लोकसभेच्या रिंगणात
Loksabha Election : भाजपने यंदाच्या निवडणुकीत ‘या’ 7 विद्यमान खासदारांचा केला पत्ता कट
Buldhana Accident: अंत्यसंस्कारावरून परतणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; 6 जण गंभीर जखमी
Pune News : खबळजनक ! आईच्या कुशीत विसावलेल्या 7 महिन्यांच्या बाळाची अज्ञाताकडून चोरी
Madha Loksabha : शरद पवारांना माढ्यात मोठा धक्का ! ‘हा’ नेता लागला फडणवीसांच्या गळाला
Weather Update : पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट
Supriya Sule : अजित पवारांनी केलेल्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंनी दिले चोख उत्तर
Sahil Khan : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी बॉलीवूड अभिनेता साहिल खानला अटक
Sharad Pawar : डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात