नाशिक : लोकसभेच्या रिंगणात अनेक उमेदवार विजय खेचून आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. या लोकसभेत राजकीय नेत्यांबरोबरच सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, क्रिकेटपटू, व्यावसायिक आणि गुन्हेगार पार्श्वभूमीच्या उमेदवारांसह साधुसंत देखील रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. देवभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशकात असाच साधू संतांचा मेळा सध्या पहायला मिळतोय. या ठिकाणाहून तीन महंत म्हणजेच शांतिगिरी महाराज, सिद्धेश्वरनंद महाराज आणि अनिकेत शास्त्री महाराज हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. चला तर मग या ३ महंतांबद्दल जाणून घेऊया…
1) शांतिगिरी महाराज
वेरुळ मठाचे मठाधिपती असलेले शांतिगिरी महाराज हे अनेक वर्षांपासून अध्यात्माशी जोडले गेले असले तरीही ते राजकारणाशी देखील जोडलेले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांना मानणारा वर्ग मोठ्या संख्येने आहे. शांतिगिरी महाराज यांनी छ. संभाजीनगरमधून 2009 ची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी तब्बल 1 लाख 42 हजार मतं देखील मिळवली होती. शांतिगिरी महाराज यांचे प्रामुख्याने काम हे शिक्षण क्षेत्र आणि व्यसनमुक्ती यामध्ये आहे. तसेच आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे तब्बल 38 कोटी 81 लाख 53 हजार 339 रुपयांची संपत्ती असून ते अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.
2) महंत सिद्धेशरानंद सरस्वती
त्र्यंबकेश्वर येथील श्रीराम शक्तिपीठ संस्थानचे स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांचे शिष्य सिद्धेश्वर महाराज हे उच्चशिक्षित असून सध्या श्रीराम शक्तिपीठ आणि पंचायती आखाडा श्री निरंजन आखाड्याचे महंत आहेत. नदी स्वच्छता मोहीम, कुपोषण मुक्ती यासंदर्भात त्यांनी आदिवासी पाड्यांमध्ये मोठं काम केलं आहे. त्याचबरोबर त्यांचा भक्तपरिवार देखील मोठा आहे. राजकारणाचा घसरलेला स्तर सुधारण्यासाठी आपण निवडणूक लढवू इच्छितो, असं मत त्यांनी व्यक्त केलंय.
3) अनिकेत शास्त्री महाराज
अनिकेत शास्त्री महाराज हे महर्षी पंचायतन सिद्धपीठमचे पीठाधीश्वर आहेत. त्याचबरोबर अखिल भारतीय संत समिती, धर्म समाजाचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत. त्यांनी अध्यात्माचा प्रचार केवळ देशातच नाही तर विदेशात सुद्धा केलाय. त्याचबरोबर वेदांचा प्रचार प्रसार, गौशाला बचाव अशा विविध अध्यात्मिक आणि सामाजिक कार्यात ते सक्रिय आहेत. तर सध्या ते भाजपकडून नाशिक लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत.
दर बारा वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याचा प्रत्यय यंदा नाशिक लोकसभेत येणार अशी चिन्ह दिसून येत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मिळालेल्या राजकीय यशानंतर देशभरातील अनेक साधू महंत हे राजकारणाच्या आखाड्यात उतरत आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून हे तीनही महंत सध्या नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरलेत. मात्र यामुळे राजकीय नेत्यांचे टेन्शन वाढलंय. आणि या महंतांना मिळणाऱ्या मतांचा फटका हा राजकीय नेत्यांना बसणार असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे आता या तीनही महंतांपैकी खरोखर निवडणुकीला सामोरं कोण कोण जाणार आणि किती मतं मिळवणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलंय.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Loksabha Election : भाजपने यंदाच्या निवडणुकीत ‘या’ 7 विद्यमान खासदारांचा केला पत्ता कट
Buldhana Accident: अंत्यसंस्कारावरून परतणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; 6 जण गंभीर जखमी
Pune News : खबळजनक ! आईच्या कुशीत विसावलेल्या 7 महिन्यांच्या बाळाची अज्ञाताकडून चोरी
Madha Loksabha : शरद पवारांना माढ्यात मोठा धक्का ! ‘हा’ नेता लागला फडणवीसांच्या गळाला
Weather Update : पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट
Supriya Sule : अजित पवारांनी केलेल्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंनी दिले चोख उत्तर
Sahil Khan : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी बॉलीवूड अभिनेता साहिल खानला अटक
Sharad Pawar : डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात