मुंबई : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरू असून त्याचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. ठराविक काही जागा सोडल्या तर जवळजवळ सगळ्या जागांवरील लढती निश्चित झाल्या आहेत. राज्यात 2019 च्या निवडणुकीत भाजपचे 23 खासदार निवडून आले होते. त्यापैकी 7 खासदारांना यावेळी भाजपने तिकीट नाकारले आहे. त्यांच्या जागी भाजपने नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. तर भाजपने कोणत्या खासदारांचे तिकीट कापले आणि त्यांच्या जागी कोणत्या नवीन चेहऱ्याना संधी दिली त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…
1) उत्तर मध्य मुंबई
भाजपने उत्तर मध्य मुंबईत ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या ठिकाणी पूनम महाजन या विद्यमान खासदार आहेत. मात्र त्यांना डावलून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
2) उत्तर मुंबई
त्तर मुंबईत मोठ्या मताधिक्क्याने विजयी झालेल्या गोपाळ शेट्टी यांचा यावेळी भाजपने पत्ता कट केला आहे. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना संधी देण्यात आली आहे.
3) उत्तर पूर्व मुंबई
उत्तर पूर्व मुंबईमधून 2019 मध्ये मनोज कोटक यांनी विजय मिळवला होता. मात्र त्यांच्याजागी यावेळी मिहिर कोटेचा यांना भाजपने तिकीट दिले आहे.
4) बीड
बीडमधून प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून त्यांच्या जागी पंकजा मुंडे यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे.
5) अकोला
अकोल्यातून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे तिकीट कापून त्यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना तिकीट देण्यात आले आहे.
6) सोलापूर
सोलापूरमध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदेंचा पराभव करणाऱ्या जयसिद्धेश्वर स्वामी यांचे तिकिट कापून त्यांच्या जागी यावेळी भाजपने आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
7) जळगाव
जळगावमध्ये भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून त्यांच्या जागी स्मिता वाघ यांना तिकीट जाहीर केले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Buldhana Accident: अंत्यसंस्कारावरून परतणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; 6 जण गंभीर जखमी
Pune News : खबळजनक ! आईच्या कुशीत विसावलेल्या 7 महिन्यांच्या बाळाची अज्ञाताकडून चोरी
Madha Loksabha : शरद पवारांना माढ्यात मोठा धक्का ! ‘हा’ नेता लागला फडणवीसांच्या गळाला
Weather Update : पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट
Supriya Sule : अजित पवारांनी केलेल्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंनी दिले चोख उत्तर
Sahil Khan : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी बॉलीवूड अभिनेता साहिल खानला अटक
Sharad Pawar : डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात