मुंबई : भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी दोन दिवसांपूर्वी राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. ती आता त्यांनी मागे घेतली आहे. नाराज असलेल्या निलेश राणेंची अखेर मनधरणी करण्यात यश भाजपला यश आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर निलेश राणेंची नाराजी दूर झाली आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याने राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा निलेश राणे यांच्याकडून करण्यात आली होती. आता अखेर ही नाराजी दूर झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात राणेंच्या नेतृत्वात झंझावात सुरू राहणार आहे.