कोल्हापूर : कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात बंडखोरी केलेले काँग्रेसचे (Congress) माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांचे पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानंतर उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर काँग्रेसकडून करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराज आणि शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक असा सामना रंगणार आहे. शाहू महाराजांना ओबीसी, वंचित आणि एमआयएमकडून पाठिंबा देण्यात आला आहे. प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या बाजीराव यांनी केलेल्या बंडखोरीने त्यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई करण्यात आली आहे. बाजीराव खाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी बंडखोरी केली होती. खाडे यांनी माघार घेण्यासाठी पंधरा-वीस दिवस मनधरणी केली. मात्र,पक्षाकडून सामान्य कार्यकर्त्यांना बेदखल केल्यामुळे स्वाभिमानासाठी मैदानात उतरल्याची घोषणा करण्यात आली होती.
कोण आहेत बाजीराव खाडे?
करवीर तालुक्यातील सांगरुळमधील बाजीराव खाडे गेल्या 28 वर्षांपासून काँग्रेस पक्षामध्ये सक्रीय आहेत.त्यांनी युवक काँग्रेस पासून काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय सचिव म्हणून काम केले असून त्यांच्यावर पक्ष नेतृत्वाने विविध राज्यांची जबाबदारीदेखील सोपवली होती.काँग्रेसने शिवसेना ठाकरे गटाकडून कोल्हापूर मतदारसंघ मिळवून शाहू छत्रपती यांना उमेदवारी दिल्यानंतर देखील बाजीराव खाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Solapur News : भाजपला आणखी एक धक्का ! ‘या’ नेत्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये केला प्रवेश
Pune News : संपत्ती लुबाडण्याचा काँग्रेसचा कट; भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका
Loksabha : महायुतीत ‘या’ जागेचा तिढा अद्यापही सुटेना; 1 जागा अन् 3 इच्छुक?
Ruturaj Gaikwad : धोनीला ‘जे’ 17 वर्षांत जमलं नाही ‘ते’ ऋतुराजने पहिल्याच वर्षांत केले
RBI : आरबीआयची आणखी एका बँकेवर कारवाई ! ‘या’ बँकेतून ग्राहकांना काढता येणार नाही पैसे
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुण्यातील सभेची जागा बदलली; आता ‘या’ ठिकाणी होणार सभा
Shikhar Bank Loan Case : शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चीट