Zareen Khan

Zareen Khan : बॉलीवूड अभिनेत्री जरीन खान विरोधात अटक वॉरंट जारी

889 0

मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोलकाता सियालदह न्यायालयाने बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जरीन खानच्या (Zareen Khan) नावावर अटक वॉरंट जारी केले आहे. एका कंपनीने अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल केली होती. 2018 मध्ये सहा कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्याबद्दल जरीनविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. कोलकाता आणि उत्तर 24 परगणा येथील 6 काली पूजेच्या कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्याबद्दल तिच्यावर केस दाखल करण्यात आली होती. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या वतीने नरकेलडांगा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जरीन खानची बॉलिवूड कारकीर्द
जरीन खानने 2010 मध्ये रिलीज झालेल्या ‘वीर’ या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात जरीननं सलमान खानसोबत काम केले.या चित्रपटातून जरीन प्रसिद्धीही मिळाली. पण काही काळानंतर जरीन खानच्या कामाचे कौतुक करण्याऐवजी प्रेक्षक तिच्या लूकची अभिनेत्री कतरिना कैफशी तुलना करू लागले.

हाऊसफुल-2 आणि हेट स्टोरी 3 या चित्रपटांमध्ये देखील जरीन खाननं काम केलं आहे. जरीन खानने पंजाबी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे. जरीन खानने अ‍ॅक्शन थ्रिलर चाणक्यद्वारे तेलुगू सिनेमात पदार्पण केले. 2014 मध्ये रिलीज झालेल्या जट्ट जेम्स बाँड या पंजाबी चित्रपटामध्ये देखील तिनं काम केलं.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!