Yawatmal Crime

Yawatmal Crime : यवतमाळ हादरलं ! टोळक्यांचा दोघांवर प्राणघातक हल्ला

723 0

यवतमाळ : यवतमाळमध्ये (Yawatmal Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये धारदार शास्त्राने दोन तरूणावर प्राणघातक हल्ला करून एकाची निघृणपणे हत्या केली आहे. यातील एका घटना शहरातील राणाप्रताप गेट परिसरात तर दुसरी घटना उमरसऱ्यातील बाल गोकुलम स्कुलजवळ घडली आहे. अंकीत गणेश कुकडे (28) रा. उमरसरा असे मृत तरुणाचे नाव आहे तर स्वप्नील विठाळकर (18) रा. रामनगर, यवतमाळ आणि अजिंक्य नाचपेलवार (24) रा. शांती नगर, वडगाव, यवतमाळ अशी जखमींची नावे आहे.

काय घडले नेमके?
प्रज्वल रोहनकर (19), यश सुभेदार (21), श्रेयश राऊत (21) आणि एका अनोळखी तरूणाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून 2 मारेकऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. शहरातील वडगाव येथील अक्षय नाचपेलवार याचे राणाप्रताप गेट परिसरात चाहाचे दुकान आहे. रविवारी रात्री 9.15 वाजताच्या सुमारास अक्षय याचा चुलत भाऊ अजिंक्य नाचपेलवार हा मित्रासोबत चाहाच्या दुकानाजवळ गप्पा मारत होता. यावेळी प्रज्वल रोहनकर, यश सुभेदार, श्रेयश राऊत आणि एका अनोळखी तरूणाच्या टोळक्यांनी घेवून धुमाकूळ घालत शिवीगाळ केली. यावेळी अजिंक्य याच्यासोबत वाद करीत त्याच्यावर धारदार चाकुने वार करण्यात आले. यानंतर आरोपींनी घटनास्थवरून पळ काढला.

त्यानंतर या टोळक्यांनी आपला मोर्चा उमरसरा परिसरातील बाल गोकुलम स्कुलकडे वळवला. यावेळी त्या ठिकाणी उमरसरा येथील अभिमन्यू देऊळकर, अंकीत कुकडे, स्वप्नील विठाळकर, आणि श्रेयस मोकळे आदी मित्र गप्पा करीत होते. अशात रात्री 10.15 वाजताच्या सुमारास प्रज्वल रोहनकर, यश सुभेदार, श्रेयश राऊत आणि एक अनोळखी तरूण दोन दुचाकीने त्या ठिकाणी आले. यावेळी प्रज्वल याने अंकीतला मी आताच राणाप्रताप येथून मर्डर करून आलो आहे. आम्ही इथे आलो कोणाला सांगू नका, चला निघा इथून असे म्हणून त्याच्या जवळील चाकुने अंकीत याच्या गळ्यावर आणि पाठीवर वार केले. त्यानंतर स्वप्नील विठाळकर याच्या कानावर आणि गालावर वार केले. तसेच त्याच्यासोबत असलेल्या यश सुभेदार याने अभिमन्यू देऊळकर याला मारहाण केली तर श्रेयश राऊत याने त्याच्यासोबत असलेल्या तरूणाने श्रेयश मोकळे याला मारहाण केली.

यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी अंकितला मृत घोषित केले. तर स्वप्नील विठाळकर याच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी चौघांवर अवधुतवाडी पोलीस ठाण्यात खून, खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक धैर्यशील घाडगे, राम भाकडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Pune

पुण्यात तीन कोटी 42 लाखाची रोख रक्कम जप्त; गुन्हे शाखेची कारवाई

Posted by - May 9, 2023 0
पुणे : पुण्यातील (Pune) हडपसर परिसरातून तब्बल 3 कोटी 42 लाख रुपयांची रोख रक्कम पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट पाच…
Sanjay Raut

Sanjay Raut : लोकसभेत मविआ 48 पैकी ‘एवढ्या’ जागा जिंकेल; संजय राऊतांनी वर्तवले भाकीत

Posted by - April 5, 2024 0
मुंबई : 2024 या लोकसभा निवडणुकीला (Loksabha) सुरुवात झाली असून देशात या निवडणुका 7 टप्प्यात घेतल्या,जाणार असून महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये…
ST Video

ST Video : एसटीचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर; हातात छत्री धरून बस ड्रायव्हरला चालवावी लागली बस

Posted by - August 25, 2023 0
गडचिरोली : सध्या राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे तर काही ठिकाणी अजूनही काही लोक पाऊसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसामुळे…

नंदुरबार : अत्याचार पीडित महिलेची आत्महत्या ? पालकांची न्यायासाठी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे धाव

Posted by - September 14, 2022 0
मुंबई : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील एका विवाहितेवर काही लोकांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर त्या महिलेचा अकस्मात मृत्यू…
Maharashtra Weather Update

Weather Update : महाराष्ट्रात कोसळणार अवकाळी पाऊस ! हवामान खात्याने दिला ‘हा’ नवा अलर्ट

Posted by - May 1, 2024 0
मुंबई : अवकाळी पावसामुळे (Weather Update) यावर्षी महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यात पिकांचं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *