Fraud

Fraud News : लष्करात भरती करण्याच्या आमिषाने तरुणांना 29 लाखांचा गंडा

416 0

पुणे : पुण्यामधून फसवणुकीचे (Fraud News) एक मोठे प्रकरण समोर आले आहे. यामध्ये लष्करी गणवेश घालून मोठ्या अधिकाऱ्यांच्या ओळखी असल्याचे सांगून 9 तरुणांना लष्करात भरती करण्याचे आमिष दाखवून आरोपीने 28 लाख 88 हजार रुपयांना गंडा (Fraud News) घातला आहे. आरोपीने पुणे, धुळे, औरंगाबाद, सातारा येथील तरुणांची फसवणूक केली आहे.

#FRAUD : ऐश्वर्या, दीपिका, आलिया, ह्रितिक अशा दिग्गज बॉलीवूड स्टार्सच्या नावाने क्रेडिट कार्ड बनवून बँकेला लाखोंचा चुना; 98 सेलिब्रिटींची नावे आली समोर; वाचा काय आहे प्रकरण…

काय आहे संपूर्ण प्रकरण?
या फसवणुकीप्रकरणी कोंढवा पोलिसांनी प्रमोद भिमराव यादव (वय 27, रा. येवलेवाडी, कोंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील एका 29 वर्षाच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही फसवणुकीची घटना सप्टेबर 2022 ते 18 जून 2023 दरम्यान घडली आहे.

ATM FRAUD ! एटीएम वापरताना काय काळजी घ्यावी ? फसवणुकीपासून व्हा सावध

आरोपी प्रमोद यादव हा लष्कराचा गणवेश घालून लोकांना आर्मीमध्ये अधिकारी असल्याचे सांगत होता. तसेच माझी मोठ्या अधिकार्‍यांशी ओळख आहे. असे सांगून लोकांना आर्मीमध्ये भरती करतो, असे आमिष दाखवित होता. त्याने आपल्या जाळ्यात सातारा, धुळे, औरंगाबाद येथील तरुणांना आपल्या जाळ्यात ओढले होते. आरोपीने या तरुणांकडून 28 लाख 88 हजार रुपये उकळले. पैसे देऊन एक वर्षाहून अधिक काळ झाला तरी भरती न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बाबर (API Babar) करत आहेत.

Share This News

Related Post

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा- डॉ.सुहासिनी घाणेकर

Posted by - July 21, 2022 0
पुणे : राज्य शासनाचे सर्व विभाग, निमशासकीय यंत्रणा, शाळा, महाविद्यालये आदी सर्वांनीच पुढाकार घेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे…

चलो अयोध्या ! मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याचे नियोजन त्याच पदाधिकाऱ्यांकडे ज्यांनी…….

Posted by - April 7, 2023 0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या रविवारी अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहेत. या कार्यक्रमाचा एक टिझर देखील सोशल मीडियावर झळकला आहे. एकूणच शिवसेना…

TOP NEWS SPECIAL REPORT : हार्दिक पटेलांना भाजपची उमेदवारी; कसा आहे हार्दिक पटेल यांचा राजकीय प्रवास

Posted by - November 11, 2022 0
कधीकाळी भाजपच्या प्रमुख टीकाकारांपैकी एक असणारे हार्दिक पटेल यांना भाजपानं वीरमगाम मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा हार्दिक…
Breaking News

मोठी बातमी : “महाराष्ट्रातील गाड्या पुढे जाऊ देणार नाही…!”, बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला; महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटण्याची शक्यता

Posted by - December 6, 2022 0
बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सुरू आहे. कर्नाटक सरकारकडून सातत्याने आक्रमक भूमिका घेतली जाते आहे. काही दिवसांपूर्वीच…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *