Shinde Fadanvis

मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील? ‘या’ नेत्यांची लागणार मंत्रीपदी वर्णी

518 0

मुंबई : सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निर्णय सुप्रीम कोर्टात झाल्यानंतर, आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) हे पुढच्या निवडणुकांपर्यंत स्थिर असल्याचं मानण्यात येत आहे. शिवसेना पक्ष कुणाचा, प्रतोद कोण आणि 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेणार असल्याचं सुप्रीम कोर्टानं निर्णयात स्पष्ट केलं आहे. यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची चर्चा रंगू लागली आहे. आता या मंत्रिमंडळाबाबत केंद्राकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

त्यामुळे आता येत्या 10 ते 11 दिवसांत मे अखेरीपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. मात्र, त्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह 20 जणांनाच मंत्रिपदं देण्यात आली आहेत. शिंदे गट आणि भाजपाचे अनेक जण उत्सुक असल्याचं सांगण्यात येतंय. पहिल्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला संधी देण्यात आलेली नाही.

भाजपकडून मंत्रीपदासाठी ‘या’ नावाची चर्चा
1. संजय कुटे
2. जयकुमार रावल
3. पंकजा मुंडे
4. माधुरी मिसाळ
5. किसन कथोरे
6. राणा जगजितसिंह पाटील
7. नितेश राणे
8. प्रशांत ठाकूर
9. योगेश सागर

शिंदे गटाकडून मंत्रीपदासाठी ‘या’ नावाची चर्चा
1. संजय शिरसाट
2. योगेश कदम
3. भरत गोगावले
4. प्रकाश आबिटकर
5. बालाजी किणीकर
6. बच्चू कडू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!