पुणे : ” नरेंद्र मोदी सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या भारतीय संविधानाला धोका निर्माण झाला असून , काँग्रेस पक्ष हा कायमच संविधानाच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे. नरेंद्र मोदी यांना या देशांमध्ये संपूर्णतः हुकूमशाही आणावयाची असल्याने भारतीय संविधान त्यांना अडसर ठरत आहे , त्यामुळेच भारताचे संपूर्ण संविधान बदलणे हा त्यांचा अजेंडा आहे.संविधान बदलासाठी ते 400 पार चा नारा देत आहे परंतु या देशातील जनतेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानावर नितांत प्रेम असल्याने या निवडणुकांमध्ये संविधान बदलाचा नारा देणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा निश्चित पराभव होईल. ” असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
34 पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ रिपब्लिकन व आंबेडकरी पक्ष संघटनांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेल्या संविधान सन्मान रथा चे उद्घाटन आज पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी ” भाजपा नेत्यांकडून संविधान बदलाच्या सातत्याने होणाऱ्या विधानांमुळे आंबेडकरी जनतेत चीड निर्माण झाली आहे. सध्या आंबेडकरी जनमत हे संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस उमेदवाराला अनुकूल असून कोणत्याही स्वरूपामध्ये मत विभागणी न होता रवींद्र धंगेकर यांचा विजय मोठ्या मताधिक्याने होईल अशी ग्वाही दिली.”
सदर वेळी निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील , पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे , प्रचारप्रमुख व माजी आमदार मोहन जोशी ,रिपब्लिकन जनशक्ती पक्षाचे शैलेंद्र मोरे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जीवन घोंगडे, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस मिलिंद आहिरे, रिपाईचे अशोक जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Murlidhar Mohol : उद्योगांच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविणार : मुरलीधर मोहोळ
Pune News : विचार पुण्याचा… दीर्घकालीन हिताचा! भाजपकडून लोकसभेसाठी संकल्पपत्र जाहीर
Pune News : विचार पुण्याचा… दीर्घकालीन हिताचा! भाजपकडून लोकसभेसाठी संकल्पपत्र जाहीर
Ajit Pawar : ‘निवडणूक होऊ द्या! एका एकाला कसा सरळ करतो’ अजित पवारांनी भरसभेत दिला दम
Sharad Pawar : शरद पवारांनी व्यक्त केली ‘ती’ भीती; म्हणाले…
Weather Update : पुढील 24 तास खूप महत्वाचे; हवामान खात्याने दिला ‘हा’ नवीन अलर्ट
Gold Rate : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं महागलं!
Accident News : ट्रकचालकाकडून झाली ‘ती’ चूक अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब संपलं
Maharashtra Politics : विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजलं ! ‘या’ दिवशी होणार निवडणूक
High Court : धाराशिवच्या नामकरणाबाबत उच्च न्यायालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Palghar Crime : धक्कादायक ! 3 महिलांनी केली पोलिसांना बेदम मारहाण
Pune Firing : पुणे पुन्हा हादरलं ! दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भरवस्तीत केली फायरिंग
Jalgaon Crime : जळगावमध्ये भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू
Gunaratna Sadavarte : सदावर्ते दाम्पत्याला मोठा धक्का ! एसटी बँकेतील संचालकपद केले रद्द
Nanded Accident : नांदेडमध्ये ट्रकला वाहनांची धडक बसल्याने भीषण अपघात