नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वंदे भारत एक्स्प्रेसनंतर (Vande Bharat Metro) भारतीय रेल्वेने आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. 15 फेब्रुवारी 2019 मध्ये वंदे भारत एक्स्प्रेस भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सेवेत आली. वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रती तास 100 किमी वेग आणि आरामदायी प्रवास ही खास वैशिष्ट्य प्रवाशांना चांगलीच पसंतीस पडली आहेत. त्यानंतर आता सरकार वंदे भारत मेट्रोही आणणार असल्याची चर्चा सुरु झाली.
कुठे तयार होतेय मेट्रो?
वंदे भारत मेट्रोची पहिली झलक समोर आली आहे. पंजाबच्या कपरूथलामध्ये असलेल्या रेल्वे कोच फॅक्ट्रीत वंदे भारत मेट्रोचं काम सुरु आहे. मीडिया रिपोर्टनुसार पहिल्या वंदे भारत मेट्रोची ट्रायल रन जुलै 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे. वंदे भारत मेट्रोमुळे रेल्वे प्रवाशांना आरामदायी प्रवासाबरोबरच कमी किंमतीत वेगवान प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. वंदे भारत मेट्रो इंटर सिटी आणि इंट्रा सीटीदरम्यान धावणार आहे.
काय आहेत या ट्रेनची वैशिष्ट्ये?
वंदे भारत मेट्रो कमीत कमी 12 डब्यांची असेल. प्रत्येक डबा अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असेल. प्रवाशांच्या प्रतिक्रिया, गर्दी आणि मागणीच्या आधारावर मेट्रोच्या डब्यात वाढ केली जाणार आहे. जास्तीत जास्त 16 डब्यांपर्यंत वाढ करणं शक्य होणार आहे. कमी वेळेत जास्त अंतर कापण्याचं या मेट्रोचं उद्दीष्ट्य असणार आहे. चाचणीनंतर देशभरात मेट्रो लाँच केली जाणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसप्रमाणेच वंदे भारत मेट्रोही पांढऱ्या आणि भगव्या रंगात असण्याची शक्यता आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Murlidhar Mohol : झोपडीधारकांना मिळणार हक्काचे घर : मुरलीधर मोहोळ
Kolhapur News : मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू
Solapur Loksabha : खळबळजनक ! मतदाराने पेट्रोल टाकून EVM मशीन जाळली
Loksabha Elections : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या गांधीनगर मधून बजावला मतदानाचा हक्क
Loksabha Elections : राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क
Dattatray Bharane : आमदार दत्ता भरणेंनी कार्यकर्त्याला दिल्या शिव्या; Video आला समोर
Loksabha Elections : सोलापूर लोकसभेचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क
Loksabha Elections : युवराज छत्रपती संभाजीराजेंनी बजावला मतदानाचा हक्क
Loksabha Elections : माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात बजावला मतदानाचा हक्क
Loksabha Elections : मंत्री हसन मुश्रीफांनी कोल्हापुरातील कागल मध्ये बजावला मतदानाचा हक्क
Loksabha Elections : भोरचे आमदार काँग्रेस नेते संग्राम थोपटेंनी बजावला मतदानाचा हक्क
Raigad Loksabha : धक्कादायक ! रायगडमध्ये मतदान केंद्रासमोरच मतदाराचा उष्माघाताने मृत्यू
Loksabha Elections : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क
Loksabha Elections : ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क
Loksabha Election : नारायण राणेंनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क
Supriya Sule : मतदानानंतर सुप्रिया सुळेंनी गाठले अजित पवारांचे घर
Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा