‘ तो ‘ मेसेज पाकिस्तानमधून ? मुंबई ट्रॅफिक कंट्रोलला आलेल्या धमकीच्या मेसेजने खळबळ ; पोलीस प्रशासन अलर्ट

414 0

मुंबई : मुंबई ट्रॅफिक कंट्रोल धमकीच्या मेसेजमुळे मुंबई पोलीस सतर्क झाली आहे. 26/11 सारखा हल्ला घडवून आणू असा धमकीचा मेसेज आला असल्याचे समजते . तर काही दिवसांपूर्वी हरिहरेश्वर मध्ये सापडलेल्या बोटीतील शस्त्रास्त्र साठ्यामुळे कोकण आणि मुंबईमध्ये हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे. त्यातच असा मेसेज मिळाल्यामुळे पोलीस अधिक सतर्क झाले आहेत . त्यासह नागरिकांनी देखील सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान हा मेसेज पाकिस्तानमधून आला असल्याची प्राथमिक माहिती देखील समजते आहे . मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी याप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे . याप्रकरणी मुंबईवर 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करणार अशी धमकी देणाऱ्या व्यक्ती विरोधात वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येतो आहे . त्यानंतर या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात येईल अशी माहिती फणसळकर यांनी दिली आहे.

” मुंबईकरांच्या सुरक्षिततेला आव्हान देणारा कोणताही कॉल आम्ही दुर्लक्षित करणार नाही . तो गांभीर्यानेच घेत आहोत . दहशतवाद विरोधी पथक सोबत आम्ही वेळोवेळी माहिती शेअर करत आहोत.” असे यावेळी विवेक फणसळकर यांनी सांगितले आहे .

Share This News

Related Post

न्यायालयाच्या निकालाने आघाडी सरकार संकटात तर बंडखोर आमदारांना मोकळे रान

Posted by - June 27, 2022 0
नवी दिल्ली- एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. महाविकास आघाडी सरकार सत्ता वाचवण्याची धडपड करत आहे तर…

भाजपा आमदार जयकुमार गोरेंच्या गाडीला अपघात

Posted by - December 24, 2022 0
सातारा: भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला फलटण येथे अपघात झाला असून ते जखमी झाले आहेत. त्यांना…

महाविकास आघाडीची मतं फोडून भाजपाचे धनंजय महाडिक विजयी

Posted by - June 11, 2022 0
राज्यसभेच्या ६ जागांसाठी राज्यात सुरु असलेली धुळवड अखेर संपली असून सहा जागांपैकी 3 जागेवर महाविकास आघाडीने बाजी मारली असून भाजपच्या…

जागतिक एड्स दिवस : 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन का साजरा केला जातो ? जाणून घ्या

Posted by - December 1, 2022 0
जागतिक एड्स दिवस : दरवर्षी १ डिसेंबर रोजी अर्थात आज जगभरात जागतिक एड्स दिन साजरा केला जातो.वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *