माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे जे जे रुग्णालयात केले दाखल ; कारागृहात चक्कर येऊन कोसळले

335 0

मुंबई : शंभर कोटींच्या वसुलीच्या आरोपावरून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. आज सकाळी त्यांना कारागृहामध्येच अचानक चक्कर आली . त्यानंतर ते जमिनीवर कोसळले. त्यांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, बीपी आणि इसीजीचा रिपोर्ट अबनॉर्मल आला असल्याचे समजते . दरम्यान तज्ञ डॉक्टर त्यांच्यावर सध्या उपचार करत आहेत.

भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर आरोपपत्र दाखल केला आहे. त्यामुळे न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यासह संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांचा देखील जामीन अर्ज फेटाळला आहे . अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे हे भ्रष्टाचार प्रकरणी आरोपी आहेत. यामध्ये सचिन वाजे माफीचा साक्षीदार झाल्यानंतर वाजे यांनी दिलेल्या जबाबानुसार अनेक गंभीर बाबींची स्पष्टोक्ती त्याच्याकडून मिळाली आहे . त्यामुळे देशमुख 100 कोटी वसुलीच्या कटातील मुख्य आरोपी असल्याचे ईडीने म्हटले आहे.

Share This News
error: Content is protected !!