नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा आश्वासक युवा सलामीवीर शुभमन गिलने (Shubman Gill) पाकिस्तानला मोठा धक्का देत आयसीसी एकदिवसीय फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकत हे स्थान पटकावले आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी बाबर आझम पहिल्या क्रमांकावर होता. या विश्वचषकात शुभमन गिलने खोऱ्याने धावा केल्या तर तर दुसरीकडे बाबर आझमच्या बॅटमधून मोठ्या कष्टाने धावा पाहायला मिळाल्या.
A big day for India's #CWC23 stars with two new No.1 players crowned in the latest @MRFWorldwide ICC Men's ODI Player Rankings 😲
Details 👇https://t.co/nRyTqAP48u
— ICC (@ICC) November 8, 2023
गिलने श्रीलंकेविरुद्ध 92 धावांची, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 23 धावांची खेळी केली. विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध खेळलेल्या इनिंगमुळे तो नंबर वन बनला. आता त्याचे 830 रेटिंग गुण आहेत, तर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम त्याच्यापेक्षा 6 गुणांनी मागे आहे. या यादीत क्विंटन डी कॉक तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांकावर असलेल्या खेळाडूमध्ये खूप फरक आहे.
भारताच्या तीन फलंदाजांचा टॉप-10 मध्ये समावेश
विश्वचषकात धावा करणारा भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांचाही शुभमन गिलसह टॉप-10 क्रमवारीत समावेश आहे. या यादीत विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे, तर रोहित शर्मा सहाव्या क्रमांकावर आहे. हे दोघे ज्या शैलीत फलंदाजी करत आहेत, ते पाहता भविष्यात क्रमवारीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.