Court Bail

Pune Lok Sabha : पुणे लोकसभा पोटनिवडणुक घ्या, मुंबई हायकोर्टाचा निवडणूक आयोगाला आदेश

450 0

पुणे : पुणे लोकसभा (Pune Lok Sabha) मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने 10 महिन्यात काहीच का हालचाली केल्या नाही, खासदारांच्या निधनानंतर एवढ्या महिने जागा रिक्त ठेवणे अयोग्य, लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्या, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पुणे लोकसभा पोटनिवडणूक अद्याप झाली नाही. त्याबाबत आज मुंबई हायकोर्टाने निवडणूक आयोगाला चांगलेच झापले आहे.

पुणे लोकसभेच्या या पोटनिवडणुकीसाठी पुणे भाजपमध्ये अनेक जण इच्छुक असल्याचे समजत आहे. त्यात स्वरदा बापट यांच्यासह शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार मेधा कुलकर्णी अशी भाजपकडे इच्छुकांची मोठी फौज आहे.कसब्यात उमेदवार चुकल्याने भाजपला हक्काचा मतदारसंघ गमवावा लागला. त्यामुळे उमेदवार निवडताना भाजपला खूप विचार करुन निर्णय घ्यावा लागणार आहे.

पुणे लोकसभा मतदार संघाचे भाजपचे गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. गिरीश बापट यांचं 29 मार्च रोजी निधन झाले होते. त्यानंतर काही महिन्यात या मतदार संघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता होती. पण जवळपास दहा महिन्यानंतरही निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीची कुठलीही हालचाल झाली नाही. त्यामुळे आज मुंबई हायकोर्टाने पुण्याची पोटनिवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Aadhar Card : आधार कार्डबाबत मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Kurla Fire : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) स्थानकात बुकिंग आणि वेटींग हॉलला भीषण आग

Pune News : पुण्यात रात्री उशीरापर्यंत धांगडधिंगा घालणाऱ्या ‘या’ 10 नामांकित हॉटेल्सवर कारवाईचा बडगा

Supriya Sule : खा. सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न

Ravindra Berde : अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे भाऊ रवींद्र बेर्डे यांचे निधन

Mahadev Book App : महादेव अ‍ॅपच्या सहसंस्थापकाला UAE मधून अटक

Pune News : नसते धाडस आले अंगलट ! कुंडात उतरलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Santosh Bhaichand Chordia : एकपात्री हास्य कलाकार युवा साथी संतोष भाईचंद चोरडीया यांचे निधन

Pune Crime : एकाला सोडलं; दुसऱ्याला पकडलं अन् तिथेच सगळं संपलं; तब्बल 10 वर्षांनी प्रियकराने तोंड उघडलं

Share This News

Related Post

Shri Tulshibag Ganapati

गणपती बाप्पा मोरया ! श्री तुळशीबाग गणपती आगमन सोहळा पहा टॉप न्यूज मराठीवर LIVE

Posted by - September 19, 2023 0
पुणे : ज्या लाडक्या बाप्पाची आपण वर्षभरापासून आतुरतेने वाट बघत असतो. तो बाप्पा आज विराजमान होत आहे. यंदाचा बाप्पाचा आगमन…
devendra-fadnavis

राज्य सरकार हिटलर प्रमाणे काम करतंय – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

Posted by - April 25, 2022 0
राज्य सरकार हिटलर प्रमाणे काम करत असून हल्ले घडवून आणणाऱ्या सरकारशी संवाद कसा साधणार असा म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र…

पुणे विद्यापीठात नृत्य संकुल उभारणार! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

Posted by - May 28, 2023 0
भारतीय संस्कृतीत नृत्यकलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे नृत्यकलेचे संवर्धन आणि प्रचार प्रसारासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे नृत्य संकुल पुणे विद्यापीठात…
Mandhardevi Temple

Mandhardevi Temple : मांढरदेवी मंदिर आज पासून 8 दिवस राहणार बंद

Posted by - September 21, 2023 0
सातारा : साताऱ्यातून एक महत्त्वाची बातमी आहे. वाई तालुक्यातील मांढरदेवी मंदिर (Mandhardevi Temple) आज पासून 28 सप्टेंबर पर्यंत भाविकांसाठी बंद…

देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ पुण्यात भाजपाचं आंदोलन

Posted by - March 13, 2022 0
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी नोटीस दिली आहे. त्याचा निषेध करण्यासाठी रविवारी पुण्यात भाजप तर्फे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *