पुणे : पुण्यात (Pune News) कल्याणीनगर भागात मध्यरात्री आलिशान कारने दुचाकीसह अनेक वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया यांचा मृत्यू झाला आहे. दोघं राजस्थानचे राहणारे होते. धक्कादायक म्हणजे आरोपी तरुण हा अल्पवयीन आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला अटक केली आहे. आरोपी चालक हा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे
पुण्यातील कल्याणी नगर परिसरात एका आलिशान सुपरकारने रात्री अडीच वाजताच्या सुमारास दोघांना उडवलं. हे दोघेही पीडित आपल्या दुचाकीवर होते. धडक इतकी भीषण होती की, दोघे हवेत उडाले आणि दुसऱ्या एका कारवर जाऊन पडले. यानंतर कार रस्त्याच्या शेजारी जाऊन धडकली आणि तिथेच थांबली. पोर्शे कारने भरधाव वेगात दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीला उडवलं. पोर्शे कारनं धक्का देताच दुचाकीवरील तरुण पुढे असणाऱ्या कारवर आदळला. तर तरुणी हवेत उंच उडाली आणि रस्त्यावर पडली. तरुणीचे डोके रस्त्यावर आपटल्याने रक्तस्राव होऊन जागीच गतप्राण झाली. तर तरुणाचाही मृत्यू झाला.
दुचाकी रस्त्याच्या एका बाजूने जात असताना मागून आलेल्या कारने त्यांना उडवलं. या अपघातानंतर पोर्शे कारमधील एअर बॅग्ज उघडल्या. त्यानंतर कार बाजूला थांबवण्यात आली. कारमध्ये तिघेजण होते. पीडितांचा मित्र एकीब रमझान मुल्ला याने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. येरवडा पोलिसांनी आरोपीविरोधात 279 (रॅश ड्रायव्हिंग), 304 अ (निष्काळजीपणामुळे मृत्यू), 337 (मानवी जीव धोक्यात घालणे) आणि 338 (गंभीर दुखापतीला कारणीभूत) आणि मोटार वाहन कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Crime : पुणे हादरलं ! प्रेयसीने संपर्क तोडल्यावर आरोपीने बहिणीवर केला गोळीबार
Mansoon Update : ‘या’ भागात मान्सून दाखल, हवामान विभागाकडून देण्यात आली माहिती
Manoj Jarange : ‘जर जरांगे पाटील विधानसभेला उभे राहिले तर…’, रावसाहेब दानवेंनी केले मोठे वक्तव्य
Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
Pune News : पुण्यात आलिशान कारने दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू; कल्यानीनगर मधील घटना
Pune Blast : गॅस चोरी करताना झाला भीषण स्फोट; चाकण-शिक्रापूर परिसर हादरला!